बिबट्या
बिबट्या 
पुणे

बछडा आईच्या कुशीत

सकाळवृत्तसेवा

निरगुडसर - वेळ रात्रीची नऊ वाजून १२ मिनिटांची. आपल्या हरवलेल्या पिलाचा शोध घेत बिबट्याची मादी आली अन्‌ तिने पाहिले आणि अवघ्या दोन ते तीन मिनिटांच्या कालावधीत मादी आपल्या पिलाला घेऊन गेली. अशा प्रकारे मंगळवारी रात्री माणिकडोह बिबट निवारा केंद्राच्या टीमकडून करण्यात आलेल्या बिबट पिलू पुनर्वसनात ५२ वे बिबट पिलू आपल्या आईच्या कुशीत विसावलं. 

नागापूर (ता. आंबेगाव) येथे मंगळवारी सकाळी नारायण म्हस्के यांच्या शेतातील ऊसतोडणी करताना ऊसतोड कामगारांना बिबट पिलू सापडले होते. सापडलेल्या पिलाला अवसरी घाटातील वनविभागाच्या केंद्रात नेण्यात आले. सायंकाळी माणिकडोह बिबट निवारा केंद्राचे डॉ. अजय देशमुख यांनी बिबट पिलाची वैद्यकीय तपासणी केली. त्यांनी ते तंदुरुस्त असल्याचा अहवाल दिला. मग सायंकाळी साडेसात वाजता ज्या ठिकाणी हे बिबट पिलू सापडलं त्याच ठिकाणी हे नर जातीचे बिबट पिलू छिद्र असलेल्या एका विशिष्ट बॉक्‍समध्ये ठेवून केंद्राची सर्व टीम व वनविभागाचे अधिकारी ५०० मीटरवर गाडीत जाऊन थांबले. पिलावर लक्ष ठेवण्यासाठी कॅमेरे लावण्यात आले होते. पिलाचा आवाज कानावर पडताच नऊ वाजून १२ मिनिटांनी बिबट मादी त्या बॉक्‍सपाशी आली.

ती दोन ते तीन मिनिटांत पिलाला घेऊन निघून गेली. पिलाला सोडण्यात डोळस, सलीम शेख, शिवाजी मोधे, योगेश काशीद या टीमसह अधिकारी प्रज्योत पालवे, वनपाल मंगेश गाडे, वनरक्षक भानुदास भालेराव, पूजा पवार, मारुती मुंडकर, संपत भोर, दशरथ मेंगडे, शरद जाधव यांनी सहभाग घेतला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT