rahu sakal
पुणे

Leopard : राहू परिसरात बिबट्याचा वावर वाढला,हल्ल्यात वासरू ठार

शेतकरी शेतामध्ये जाण्यास घाबरता. शेतमजूर सुद्धा कामाला येण्यासाठी घाबरत असल्यामुळे शेतकऱ्यांपुढे मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

संतोष काळे ः सकाळ वृत्तसेवा

राहू (ता. दौंड) - येथील सोनवणे डेअरी जवळील काळे वस्ती येथे मंगळवार (ता.२६) पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास बिबट्याच्या हल्ल्यात भागुबाई कोंडीबा काळे यांचे साधारणता अडीच वर्षांचे वासरू जागीच ठार झाले.परिसरात बिबट्याचा वावर वाढला असल्यामुळे नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण आहे. वनविभागाने सोयीस्कर गोड बोलून दुर्लक्ष न करता या परिसरात तातडीने पिंजरा लावावा. अशी मागणी येथील नागरिकांकडून होत आहे.

वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी तातडीने पंचनामा केला असून पुढील कारवाईसाठी वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवण्यात आल्याचे वनरक्षक शिवकुमार बोंबले,गणेश म्हस्के, वनसेवक भानुदास कोळपे, तेजस ठाकर यांनी 'सकाळ'ला सांगितले.

बिबट्याने अक्षरशः चक्क लोक वस्तीमध्ये येऊन वासरू ठार केल्यामुळे सोनवणे डेअरी, फार्म काळे वस्ती परिसरात मोठी घबराट पसरल्याने दहशत निर्माण झाली आहे.शेतकरी शेतामध्ये जाण्यास घाबरता. शेतमजूर सुद्धा कामाला येण्यासाठी घाबरत असल्यामुळे शेतकऱ्यांपुढे मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

शेतकरी शेतामध्ये जाण्यास घाबरता. शेतमजूर सुद्धा कामाला येण्यासाठी घाबरत असल्यामुळे शेतकऱ्यांपुढे मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. बिबट्याच्या वाढत्या हल्ल्यांमुळे येथील शेळीपालन, मेंढी पालन करणारा शेतकरी वर्ग त्रस्त झाला आहे.बिबट्या लोकवस्तीमध्ये शिरकाव करू लागला आहे. परिसरातील शेळी, मेंढी,गाई बिबट्या हल्ले करत आहे.

नागरिकांनी काय काळजी घ्यावी.

नागरिकांनी शेळ्या, मेंढ्या, लहान पाळीव जनावरे आपल्या गोठ्यामध्ये बंदिस्त करावे.

रात्रीच्या वेळी शेतीला पाणी देण्यासाठी जाताना एकटे जावू नये.

उजेडासाठी टेंभा, बॅटरींचा वापर करावा

बिबट्या दिसल्यास पाठलाग करू नये.

फटाके वाजवा..

घराच्या अंगणात झोपू नये

लहान मुलांना एकटे सोडू नये

शेतामध्ये जाताना समूहाने जा. असे आव्हान वन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

ज्यादा पिंजऱ्यांची मागणी करू

दौंडच्या पश्चिम पट्ट्यासह राहू बेटपरिसरात बिबट्यांची वाढती संख्या ही वन विभागाचे आता पक्की डोकेदुखी बनली आहे. दिवसाआड बिबट्याचे हल्ल्यांचे सत्र सुरूच आहे. आळा बसण्यासाठी वरिष्ठ कार्यालयाकडून परवानगी घेऊन जास्तीत जास्त पिंजरे लावून बिबट्याला जेरबंद करण्यासाठी प्रयत्न केले जातील. कल्याणी गोडसे : दौंड तालुका वनपरिक्षेत्र अधिकारी.

बिबट्याला लपायला वाव.. राहू बेट (ता. दौंड) हा परिसर मुळा- मुठा, आणि भीमा नदीच्या कडेला आहे. उसासह वन विभागाचे मोठ्या प्रमाणात क्षेत्र आहे. बिबट्याला लपायला अधिक वाव आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PBKS vs RCB: वेंकटेश अय्यरची तुफानी फटकेबाजी, विराट कोहलीचंही विक्रमी अर्धशतक; बंगळुरूने पंजाबसमोर ठेवलं भलं मोठं लक्ष्य

Pune Crime : उरुळी कांचनमध्ये पतीकडून पत्नीच्या गुप्तांगावर ॲसिड हल्ला; १५ दिवस घरात कैद

Pune Crime: पुणे-सोलापूर महामार्गावर मांगूर माशांची मोठी तस्करी उघड; उरुळीकांचन पोलिसांची कारवाई, पिकअप जप्त

Dried Fish Rush: पावसाळ्यापूर्वी सुक्या मासळीची धावपळ; रायगडात भाव स्थिर, खवय्यांची खरेदीला गर्दी

१०० च्या जागी ५०० तर ४०० च्या २०००... ATM मध्ये मोठी बिघाड, पैसे काढण्यासाठी लोकांची झुंबड!

SCROLL FOR NEXT