leopard1 
पुणे

पुणेकरांनो, सावधान ! 'या' भागात वावरतोय बिबट्या

कृष्णकांत कोबल

मांजरी (पुणे) : लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर माणसांची वर्दळ कमी झाल्याने दिवेघाट व पायथ्याच्या परिसरात बिबट्यासह इतर प्राणी-पक्षी मुक्त संचार करू लागले आहेत. मात्र, या भागात बिबट्या दिसण्याची वारंवारता वाढल्याने वडकी फुरसुंगी परिसरातील नागरिक धास्तावलेले आहेत. 

रामदरा ते कानिफनाथ पायथा या डोंगर रांगेच्या परिसरात सध्या सायाळ, हरिण, मुंगूस, उदमांजर, मोर, माकड, ससे व विविध प्रकारचे पक्षांचे दर्शन होऊ लागले असल्याचे स्थानिक नागरिक सांगत आहेत. या प्राण्या पक्षांबरोबरच बिबट्याचा वावरही येथे वाढला आहे.

वाहनांची वर्दळ कमी असल्याने थेट दिवे घाटातून हा बिबट्या फिरताना व पहुडताना प्रवाशांना दिसला आहे. कधी पुरंदर तालुका हद्दीत तर कधी वडकी (हवेली तालुका) हद्दीत हा बिबट्या वावरताना दिसत आहे. दोन्ही हद्दीतील वन अधिकाऱ्यांनी याला दुजोरा दिला आहे. 

वनाधिकारी राहुल रासकर म्हणाले, "गेल्या काही दिवसांपासून दिवे घाटाच्या परिसरात बिबट्याचे वास्तव्य असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून आलेल्या आहेत. परिसराच्या पाहणीत बिबट्याच्या पायाचे ठसेही मिळाले आहेत. हा बिबट्या घाट परिसरात फिरत असल्याने त्याला पकडण्यासाठी पिंजरा कोठे लावता येईल,

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे- क्लिक करा

याबाबत दोन्ही हद्दीतील अधिकारी विचार करीत आहेत. योग्य ठिकाण पाहून पिंजरा लावण्यात येईल.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

U19 World Cup: पुणेकराचं मार्गदर्शन अन् टीम इंडियाने जिंकला वर्ल्ड कप! भारतीय क्रिकेटचे भविष्य घडवणारा मराठमोळा प्रशिक्षक

Epstein files: 'एपस्टीन'चे नराधम! लहान मुलांचा बळी देऊन मांस खायचे? नव्या कागदपत्रांमध्ये नरभक्षणासंदर्भात स्पष्ट उल्लेख

U19 World Cup: 'सूर्याला तुम्ही थांबवू शकत नाही...' वैभव सूर्यवंशीच्या वादळी १७५ धावानंतर सेहवागची पोस्ट चर्चेत

Chandrapur Election: चंद्रपूरमध्ये 'असा' निघाला तोडगा! वडेट्टीवार–धानोरकर वादावर पडदा

Brahmapuri Crime : मुलीला आजीकडे झोपवल्याच्या रागातून मुलाकडून वडिलांचा लोखंडी सब्बलने वार करून निघृण खून; आरोपी ताब्यात

SCROLL FOR NEXT