leopard 
पुणे

बारामती तालुुक्यात बिबट्याचा वावर; नागरिकांमध्ये भिती

राजकुमार थोरात

बारामती : बारामती तालुक्यातील कन्हेरी व काटेवाडी परीसरामध्ये बिबट्या ठसे आढळले असून नागरिकामध्ये भितीचे वातावरण झाले आहेत. बिबट्याची मादी व पिल्ले असण्याचा वनविभागाचा अंदाज असून  बिबट्याचा शोध घेण्यासाठी वनविभागाचे कर्मचाऱ्यांनी रात्रीची गस्त घालण्यास सुरवात केली आहे.

बारामती तालुक्यामध्ये गेल्या बिबट्या प्रवेश केला आहे. बारामती एमआयडीसी कंपनीमध्ये बिबट्याचा वावर असल्याचे सीसीटीव्हीचे फुटेज मिळल्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले. गेल्या आठवड्यापासुन काटेवाडी व कन्हेरी परीसरामध्ये बिबट्याचा वावर वाढला आहे. आठ दिवसामध्ये बिबट्याने एक शेळी,एक कुत्रे  व एका गाईच्या वासराचा फडशा पाडला आहे.

बिबट्याला शोधण्यासाठी वनविभागाने रात्रीपाळीची गस्त घालण्यास सुरवात केली आहे. बारामती तालुक्यामध्ये ही बिबट्या आढळला असल्याने नागरिक भयभित झाले आहे.यासंदर्भात कन्हेरीचे सरपंच सतिश काटे यांनी सांगितले की, गावामध्ये बिबट्याच्या दशहतीमुळे नागरिकामध्ये घबराहट पसरली असून प्रशासानाने बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.

बिबट्याची मादी असण्याची शक्यता...
काटेवाडी व कन्हेरी परीसरामध्ये बिबट्याची मादी व तिची पिल्ले असण्याची शक्यता असून बिबट्याच्या पिल्लांचे ही ठसे मिळाले असल्याची माहिती वनविभागाचे वनपरिमंडळ अधिकारी अमोल पाचपुते यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nimesulide Ban : Nimesulide औषधांवर सरकारची बंदी! 100 mg पेक्षा उच्च डोसवर सुरक्षा आदेश जारी

Viral Video : बॉम्बसारखा फुटला मोटोरोलाचा मोबाईल; जीन्सच्या खिशातच झाला स्फोट, पुढे जे झालं...धक्कादायक व्हिडिओ व्हायरल

एक जरी पणती विझली असती तरी... असा शूट झालेला 'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेतील पुतळाबाईंचा सती जाण्याचा सीन

PCMC Election 2025 : पुणे महापालिकेच्या ४१ प्रभागांत अर्जांची छाननी, बंडखोर उमेदवारांचा धोका

धक्कादायक प्रकार! ताडोबा सफारीत ‘स्थानिक कोटा’चा मोठा गैरवापर; बनावट आधारकार्ड वापरून फसवणुकीचे रॅकेट उघड..

SCROLL FOR NEXT