Corona_Patient 
पुणे

Corona Updates: हॉस्पिटलमधील कोरोना रुग्णांचा आकडा चार हजारांच्या आत

सकाळ वृत्तसेवा

पुणे : पुणे जिल्ह्यातील विविध रुग्णालयांत उपचार घेणाऱ्या कोरोना रुग्णांची संख्या मंगळवारी (ता.8) चार हजारांच्या आत आली आहे. सध्या 3 हजार 891 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. तसेच सक्रिय (ऍक्‍टिव्ह) रुग्णांची संख्या साडे दहा हजारांपेक्षा कमी झाली आहे. याशिवाय 924 जण कोरोनामुक्त झाले आहेत. दिवसभरात 567 नवे रुग्ण आढळून आले आहेत.

आजच्या एकूण रुग्णांमध्ये पुणे शहरातील 279 जण आहेत. दिवसभरात 7 हजार 450 कोरोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत. तसेच गेल्या 24 तासांत 17 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या आठवड्यात जिल्ह्यातील सक्रिय कोरोना रुग्णांनी अकरा हजारांचा आकडा ओलांडला होता. हीच संख्या मंगळवारी दहा हजार चारशेपर्यंत खाली आली आहे.

पुणे शहरातील सर्वाधिक 279 रुग्णांबरोबरच चिंचवडमध्ये 132, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रात 115, नगरपालिका कार्यक्षेत्रात 38 आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रात 3 नवे रुग्ण आढळून आले आहेत. आजच्या एकूण मृत्यूंमध्ये पुणे शहरातील आठ, पिंपरी-चिंचवडमधील तीन, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील पाच आणि कॅंन्टोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील एका रुग्णाचा समावेश आहे. नगरपालिका क्षेत्रातील एकाही रुग्णाचा मंगळवारी मृत्यू झाला नाही.

रुग्णालयांत उपचार घेत असलेल्या एकूण रुग्णांव्यतिरिक्त अन्य 6 हजार 541 रुग्णांवर त्यांच्या घरातच उपचार करण्यात येत आहेत. आतापर्यंत 8 हजार 525 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण मृत्यू झालेल्यांमध्ये पुणे जिल्ह्याबाहेरील 412 रुग्ण आहेत. नवे कोरोना रुग्ण आणि रुग्णांच्या मृत्यूची संख्या ही सोमवारी (ता.7) रात्री आठ वाजल्यापासून मंगळवारी (ता.8) रात्री आठ वाजेपर्यंतची आहे.

दिवसभरात कोरोनामुक्त झालेल्यांमध्ये पुणे शहरातील 220 जण आहेत. पिंपरी-चिंचवडमधील 151, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील 342, नगरपालिका
कार्यक्षेत्रातील 34 आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील 177 जण कोरोनामुक्त झाले आहेत.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sarvajan Pension Scheme: वृद्ध, विधवा अन् दिव्यांगांना दर महिन्याला थेट खात्यात पेन्शन; ‘सर्वजन पेन्शन योजने’साठी पात्रता काय?

Anganwadi Boxing: अंगणवाडीत बॉक्सिंगचे धडे! खेड्यातील चिमुकल्यांच्या डोळ्यात ऑलिम्पिकचे स्वप्न; महिला बॉक्सरच्या उपक्रमाची सर्वत्र चर्चा

Pension for Widows of Freedom Fighters: स्वातंत्र्यसैनिकांच्या विधवांनाही दरमहा २५ हजार पेन्शन; जाणून घ्या पात्रता अन् अर्ज प्रक्रिया

Nandini Krushak Samruddhi Yojana: गाई खरेदी अन् डेअरी व्यवसायासाठी ३१ लाखांपर्यंत सबसिडी; काय आहे 'नंदिनी कृषक समृद्धी योजना'?

Hair Growth Ladoo: दाट, लांबसडक आणि चमकदार केसांचे सिक्रेट; रोज सकाळी खा फक्त १ 'मॅजिक लाडू'!

SCROLL FOR NEXT