चांदणी चौक - प्रसिद्ध गायक शंकर महादेवन यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत संगीताचे धडे दिले. 
पुणे

मुलांना संगीताचा आनंद घेऊ द्या - शंकर महादेवन

सकाळ वृत्तसेवा

मयूर कॉलनी - सुरांमध्ये खेळणे, त्याच्या नादात रममाण होणे, यामुळे जीवनातील आनंद वाढतो. संगीत आयुष्याची सुंदरता वाढवते. रोजचे ताण कमी होतात आणि तुमची एकाग्रता, कार्यक्षमता आपोआपच वाढते; मात्र हल्लीचे पालक ‘रिॲलिटी शो’सारख्या कार्यक्रमांद्वारे मुलांवरचा संगीताचाच ताण वाढवतात. मुलांचे बालपण हिरावून घेऊ नका. त्यांना संगीताचा आनंद घेऊ द्या, असे आवाहन प्रसिद्ध गायक शंकर महादेवन यांनी केले. 

चांदणी चौक येथील शंकर महादेवन अकादमीच्या वतीने आयोजित विशेष कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी त्यांनी संगीत शिकू इच्छिणाऱ्या मुलांना संगीताचे धडे दिले. अकादमीचे सहसंस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीधर रंगनाथन, सहसंस्थापक नितीन कोमवार, चित्रपूर मठाचे प. पू. स्वामीजी, संचालक प्रवीण कडले आदी उपस्थित होते. संगीताचा विद्यारंभ करणाऱ्या विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांनी सात सूर, ताल आणि त्यातील वेग यांचे पायाभूत धडेही विद्यार्थ्यांना दिले. अडीच वर्षांच्या विद्यार्थ्यापासून ते ६० वर्षे वयोगटापर्यंतचे विद्यार्थी यामध्ये सहभागी झाले होते.

ते म्हणाले, ‘संगीत ही एक भाषा आहे. जगातला कोणताही विषय संगीतातून सहज शिकता व शिकवता येऊ शकतो. त्यासाठी प्रत्येकाने सादरकर्ते होण्याची आवश्‍यकता नाही. पुणे हे आपले एक अत्यंत आवडीचे ठिकाण आहे. पुण्यात मी कधी सवाईमध्ये शास्त्रीय संगीत गायला, कधी फ्युजन गायला तर कधी चित्रपट गीते गायला आलो; पण या प्रत्येकच प्रकारात पुण्याने मला कायमच भरभरून प्रेम दिले. येथील श्रोते फारच चोखंदळ आणि गुणग्राही आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT