junnar  
पुणे

दारूसाठी काय पण अन् कधी पण...  

दत्ता म्हसकर

जुन्नर (पुणे) : दारूच्या ध्यासापोटी रणरणत्या उन्हाची पर्वा न करता जुन्नर, आळेफाटा व नारायणगाव येथील विदेशी दारूच्या दुकानासमोर लांबच लांब रांगा लागल्याचे दृश्‍य पहावयास मिळत होते. 

कोरोनाच्या संसर्गाची भीती न बाळगता "रांगेत थांबू पण दारू घेऊनच जाऊ' अशा आविर्भावात ही मंडळी रांगेतील चौकोनात ठाण मांडून उभी होती. दुकानातील आहे त्या साठ्यातील आपल्या ब्रॅंडच्या बाटल्यांची खरेदी करण्याकडे बहुतेकांचा कल होता. नवीन स्टॉक येईपर्यत दारू पुरेल, अशी खरेदी होत होती. तीनही ठिकाणी स्थानिक खरेदीदाराबरोबर परिसरातील गावांतील ग्राहकांची गर्दी झाली होती. दुचाकी व चारचाकी वाहनातून येऊन दारू खरेदी केली जात होती. काही जणांनी आपल्याला रांगेत कोणी पाहिलं तर, या भीतीपोटी पैसे देऊन दुसऱ्यास उभे केले होते. 

दारू दुकाने उघडल्याने दारूबरोबर चाखण्याची खरेदी देखील होत होती. चणे, फुटाणे आदि खाद्य पदार्थ असलेल्या गाड्या जवळपास फिरत होत्या. पाण्याच्या बाटल्या देखील घेतल्या जात होत्या. देशी विदेशी मद्य विक्रेत्याच्या तुलनेत बिअर शॉपीकडे गर्दी कमी दिसत होती. 

बंदच्या काळात काही जणांना उपवास घडला, तर नियमित पिणाऱ्यांचे दुप्पट चौपट किमतीमुळे हाल झाले होते. मात्र, आता सर्वच स्तरातील मद्यपी खूष झाले असून, देशी आणि विदेशी मद्याचा आस्वाद घेत असल्याचे चित्र गावोगावी दिसत आहे.  

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Government Employee: सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात थेट २० टक्के वाढ; पश्चिम बंगाल सरकारचा मोठा निर्णय

मोदींच्या मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार, शिंदेसेनेला मिळणार आणखी दोन मंत्रीपद? या बड्या नेत्यांवर मोठी जबाबदारी सोपवणार!

अभिनेत्री प्रियदर्शिनीने दिली प्रेमाची कबुली, बॉयफ्रेंडने समुद्रकिनाऱ्यावर केलं प्रपोज, फोटो होतायत व्हायरल

Eastern Freeway: एमएमआरडीएच्या विस्तारीकरण प्रकल्पात बदल, ९४९ झाडे वाचणार; प्रशासनाचा नवा प्लॅन काय?

Latest Marathi News Live Update : छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील कन्नडकरांसाठी एक दिलासादायक बातमी

SCROLL FOR NEXT