पुणे

जुन्नर नगरपालिका निवडणुकीची तयारी सुरू

राज्य निवडणूक आयोगाचे जिल्हा प्रशासनाला पत्र

सकाळ वृत्तसेवा

जुन्नर : जुन्नर Junnar नगर पालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी For elections प्रभाग रचनेचा प्रारुप आराखडा Outline तयार करण्याच्या सूचना प्रशासनाला To the administration प्राप्त झाल्या असल्याची माहिती मुख्याधिकारी मच्छीन्द्र घोलप यांनी दिली.

महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाचे उपायुक्त अविनाश सणस यांनी शुक्रवारी ता. २० रोजी पत्राद्वारे जिल्हा प्रशासनाला नगर परिषदांच्या निवडणुकीसाठी तयारी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. ज्या नगर परिषदा व नगर पंचायतींची मुदत डिसेंबर २०२१ ते फेब्रुवारी २०२२ या कालावधीत संपत आहे तेथे मुदत संपण्यापूर्वी निवडणूक घेणे बंधनकारक आहे.

जुन्नर नगर पालिकेची मुदत डिसेंम्बर मध्ये संपत असल्याने आगामी निवडणुकीसाठी शहरांचा प्रभागानुसार प्रारूप आराखडा तयार करण्याची सूचना केली असून त्यासाठी सन २०११ ची जनगणना व शहराचा नकाशा विचारात घेण्यात येणार असल्याचे घोलप यांनी सांगितले.

यापूर्वी बहुसदस्यीय प्रभाग रचना होती. परंतु नवीन सरकारने १२ मार्च २०२० रोजी जाहीर केलेल्या अधिनियमाप्रमाणे एक सदस्यीय प्रभाग पद्धती लागू केली आहे. त्यानुसार २०११ ची जनगणना विचारात घेऊन प्रभाग रचनेचा कच्चा प्रारूप आराखडा तयार करण्याबाबत सूचना केल्या असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रभाग रचना, आरक्षण व सोडतीच्या कार्यवाहीसाठी लागणारा कालावधी विचारात घेऊन मुदत संपण्यापूर्वी निवडणूक कार्यक्रम पार पाडणे शक्य व्हावे, यासाठी सध्या प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करावा. हा कच्चा आराखडा तयार करण्याची कार्यवाही २३ ऑगस्ट २०२१ पासून सुरू करावी. कच्चा आरखडा तयार होताच आयोगाला तात्काळ ई- मेलद्वारे माहिती द्यावी. जेणेकरून पुढील कार्यवाही सुरू करता येईल अशा सूचना या पत्राद्वारे करण्यात आल्या आहेत. त्यानंतर प्रभाग रचना, आरक्षण व सोडतीच्या तारखा निवडणूक आयोगकडून जाहीर करण्यात येतील असेही सूचित करण्यात आले असल्याचे घोलप यांनी सांगितले.

https://www.oberoirealty.com/elysian?utm_source=digital&utm_medium=columbia&utm_term=ELYCLM&ad=0_5687660_ba93739e-2c1f-4d68-9646-99dde929f155-1sj4s_048a2f76-1a85-4051-b290-08932c7ed185-1sjd4_1788_58756452_144_348322_1_144_null_null_18_348011_348020_348006_null_1808_34755&col_ci=R132N802j3211629196104603ca3wdix2276kw4wn95v3k

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT