Child 
पुणे

देशातील तब्बल एवढ्या मुलांच्या रक्तातील शिशाची पातळी धोकादायक स्थितीत

सकाळवृत्तसेवा

पुणे - देशातील तब्बल २७ कोटी ५५ लाख मुलांच्या रक्तातील शिशाची पातळी धोकादायक स्थितीत आहे. एवढेच नाही तर, जगातील तीन पैकी एक मूल बाधित असल्याचे समोर आले आहे. ‘युनिसेफ’ आणि ‘प्युअर अर्थ’ या दोन संस्थांच्या संयुक्त अहवालातून ही बाब स्पष्ट झाली आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

रक्तातील शिशाचे प्रमाण पाच मायक्रोग्रॅम प्रती डेसिलिटरपेक्षा जास्त झाल्यास लहान मुलांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होतात. शिसेयुक्त पदार्थांच्या संपर्कात आल्यामुळे मानवी रक्तातील शिशाची पातळी वाढते. शिशाची बाधा झाल्यामुळे जगातील ९० लाख लोकांना दरवर्षी प्राण गमवावे लागतात. लहान मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेले रक्तातील शिशाचे प्रमाण तपासण्यासाठी युनिसेफतर्फे जगभरात सर्वेक्षण करण्यात आले. 

चेतासंस्थेवर हल्ला -
- चेतापेशींमध्ये संदेश वाहनासाठी ‘कॅल्शिअम’ महत्त्वपूर्ण भूमिका बजावते.
- कॅल्शिअम न्यूरॉनमध्ये प्रवेश करत पुढल्या चेतापेशीला संदेश पोहोचवते
- शिसे कॅल्शिअमच्या अणूलाच प्रतिबंध करते, पर्यायाने चेतापेशींमधील संदेशवहन कमी होते
- यामुळे मानसिक आजारांमध्ये वाढ होते.

शिशाचे स्रोत 

  • पिण्याचे पाणी वाहणाऱ्या नलिका
  • खाणकाम, ॲसिड लेड बॅटरी
  • कारखान्यांतून जमिनीतील पाण्यात मिसळलेले शिसे
  • रासायनिक रंग, खनिज तेल,  खेळणी आणि दागिने
  • मोबाईल, संगणक आदी इ-कचरा
  • सौंदर्यप्रसाधने आणि इतर रासायनिक पदार्थ

उपाययोजना 

  • शिसेयुक्त वस्तूंपासून लहान मुलांना दूर ठेवणे
  • पाण्याची तपासणी करणे
  • ई-वेस्टचे योग्य व्यवस्थापन
  • रासायनिक रंग आणि पदार्थांचा काळजीपूर्वक वापर
  • मुलांबरोबर पालकांनी योग्य ती खबरदारी घेणे गरजेचे

शिसाचे लहान मुलांवरील दुष्परिणाम 
कान 

  • ऐकू कमी येते
  • शरीराचा तोल ढासळतो

तोंड 

  • बोलताना अडखळणे
  • हिरड्यांवर व्रण
  • अयोग्य पदार्थ आवडतात

सामान्य 

  • आळस
  • थकवा
  • कणकण

नवजातांमध्ये विषबाधा

  • अकाली जन्म
  • जन्मावेळी वजन कमी
  • शारीरिक वाढीची गती मंदावते

त्वचा फिकी पडते

केंद्रीय चेता संस्था

  • डोकेदुखी
  • वाढ खुंटणे
  • आकलनक्षमता कमी
  • चिडचिड वाढणे
  • आक्रमकता वाढणे
  • दुर्लक्ष  मंदपणा
  • अव्यवस्थितपणा

पचनसंस्था 

  • वजन कमी होणे
  • रक्तक्षय
  • भूक न लागणे
  • मळमळ व उलटी
  • बद्धकोष्ठता
  • पोटशूळ, अतिसार

शरीर 

  • समन्वय गमावणे
  • थकवा
  • ‘कोमा’ची अवस्था

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: पुणेकरांची पाण्याची चिंता मिटली! भामा आसखेड धरण निम्म्याहून अधिक फुल्ल; आकडेवारी समोर

Water Level: अडाण जलाशयाच्या पाणीसाठ्यात आठवड्याभरात चार टक्क्यांनी वाढ;४५.७५ टक्के जलसाठा

Latest Maharashtra News Live Updates: पंचवटीमध्ये मुसळधार पावसानंतर गोदावरी नदीच्या पाणीपातळीत वाढ.

Tanisha Kotecha : नाशिकच्या तनिषा कोटेचाचे आशियाई टेबल टेनिस स्पर्धेत शानदार यश

HPCL Recruitment 2025: हिंदुस्तान पेट्रोलियमकडून 2.80 लाख पगाराची नोकरी! 300 हून अधिक जागा; जाणून घ्या अर्ज कसा करावा

SCROLL FOR NEXT