crime Sakal Media
पुणे

लष्कर भरतीसाठीची प्रश्‍नपत्रिका फोडणाऱ्या मुख्य सुत्रधार लेफ्टनंट कर्नलसह दोघांना अटक

गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने दिल्लीत ठोकल्या अधिकाऱ्याला बेड्या.

पांडूरंग सरोदे

पुणे : भारतीय लष्करातील विविध पदांसाठी झालेल्या लेखी परिक्षेसाठीची प्रश्‍नपत्रिका हि दिल्लीतील एका लेफ्टनंट कर्नल पदावरील अधिकाऱ्यानेच फोडल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. दरम्यान, पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेतील खंडणी विरोधी पथकाने दिल्लीत जाऊन संबंधीत लेफ्टनंट कर्नलसह त्याच्या साथीदारांना अटक केली. लेफ्टनंट कर्नल हाच प्रश्‍नपत्रिका फुटी प्रकरणाचा मुख्य सुत्रधार आहे.

भगतप्रितसिंग बेदी असे अटक केलेल्या लेफ्टनंट कर्नलचे नाव असून वीरप्रसाद असे त्याच्या साथीदाराचे नाव आहे. दोघांनाही दिल्लीतून अटक करण्यात आली आहे. भारतीय लष्करातील शिपाई भरती परीक्षेची प्रश्नपत्रिका फोडून सैनिक भरती प्रशिक्षण केंद्रप्रमुखांना विक्री करणाऱ्या 7 जणांना पुणे पोलिसांनी यापुर्वीच अटक केली आहे. याप्रकरणी वानवडी आणि विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल आहेत. प्रश्‍नपत्रिका फुटल्याचे लक्षात आल्यानंतर भारतीय लष्कराने संपुर्ण देशात एकाचवेळी होणारी परिक्षा रद्द केली होती. त्यानंतर खंडणी विरोधी पथकाने किशोर महादेव गिरी (वय 40, रा. माळेगाव, बारामती) माधव शेषराव गित्ते (वय 38, रा. सॅपर्सविहार कॉलनी, विश्रांतवाडी), गोपाळ युवराज कोळी (वय 31, रा. दिघी) आणि उदय दत्तू आवटी (वय 23, रा. खडकी) अशी अटक केलेल्या चौघांची नावे आहेत. यातील कोळी व आवटी हे दोघेही भारतीय लष्करातील कर्मचारी आहेत.

देशातील 40 परीक्षा केंद्रांवर 28 फेब्रुवारीला "रिेशन आर्मी शिपाई भरती लेखी परीक्षा' होणार होती. या परिक्षेसाठी देशभरातून 30 हजार विद्यार्थी बसले होते. परीक्षेची पश्नपत्रिका फोडून काहीजण प्रश्नपत्रिका सैनिक भरती प्रशिक्षण केंद्र प्रमुखांना विकणार असल्याची खबर माहिती सदर्न कमांड मिलिटरी इंटेलिजन्सच्या लायझनला मिळाली होती.

परिक्षेच्या आदल्या रात्रीच फोडलेली प्रश्‍नपत्रिका परिक्षार्थीांना देण्यासाठी माधव गित्ते याने 14 जणांना विश्रांतवाडीतील एका हॉटेलमध्ये एकत्र केले होते. त्यापूर्वीच पुणे पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने वानवडी व विश्रांतवाडी येथे सापळा रचून सात जणांना अटक केली होती. पोलिसांनी सात जणांची चौकशी केली, तेव्हा संबंधीत प्रश्‍नपत्रिका हा वसंत किलारी याच्याकडून मिळाल्याचे त्यांनी सांगितंले. त्यानंतर पोलिसांनी किलारीला अटक केली. त्याच्या चौकशीमध्ये सिकंदराबाद येथील भरती प्रक्रिया प्रमुख असलेला लेफ्टनंट कर्नल भगतप्रितसिंग बेदी व त्याचा साथीदार विरप्रसाद यांची नावे पुढे आली. त्यानंतर पोलिसांनी त्यांना बेड्या ठोकल्या. पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) अशोक मोराळे, पोलिस उपायुक्त (गुन्हे) श्रीनिवास घाडगे, सहायक पोलीस आयुक्त लक्ष्मण बोराटे, खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल पाटील, सहायक पोलीस निरीक्षक संदीप बुवा, सहायक पोलीस निरीक्षक शिरीष भालेराव, पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ शेंडगे, राजेंद्र लांडगे, पांडुरंग वांजळे, यशवंत ओंबासे, अतुल साठे, प्रवीण राजपूत, मधुकर तुपसौंदर, नितीन कांबळे, अश्विनी केकाण, गजानन सोनवलकर, प्रफुल्ल चव्हाण, पिराजी बेले यांच्या पथकाने हि कारवाई केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flood Indian Missing : नेपाळमध्ये शेकडो भारतीय पर्यटक बेपत्ता, महाराष्ट्र सरकारकडून हेल्पलाइन सुरू, असा करा संपर्क

Gokul Election 2026 : 'गोकुळ'च्या सत्ताकारणाचा काउंटडाऊन सुरू! अंतिम मतदार यादीची तारीख ठरली; उमेदवारी अर्जाचा मुहूर्तही निश्चित, 410 संस्थांच्या हरकतीवर सुनावणी

Pune News: आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची झिरवळांकडून थट्टा? ‘खाऊन-पिऊन आंदोलन करा’ म्हणताच विद्यार्थ्यांनी सुनावलं

Hydrogen Train: जगातील सर्वांत शक्तिशाली हायड्रोजन रेल्वेचा नवा विक्रम; भारताच्या पहिल्या ट्रेनने ६ हजार किमी प्रवास पूर्ण

Marathi News Live Updates : कात्रज घाटात भाजपशी संबंधित निवडणूक साहित्याचा खच; स्वच्छता ग्रुपकडून कारवाईची मागणी

SCROLL FOR NEXT