पुणे

मुलांच्या साक्षीमुळे पित्याला जन्मठेप; पत्नीचा केला होता गळा आवळून खून

सकाळवृत्तसेवा

पुणे  :कौटुंबिक वादातून मुलांसमोरच पत्नीचा गळा आवळून खून करणाऱ्या पतीला अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. आर. नावंदर यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. आईचा खून केला म्हणून मुलांनी दिलेल्या साक्षीमुळे पित्याला शिक्षा झाली आहे.

चुकीची औषधे देऊन पैसे उकळणारे दोन बोगस डॉक्‍टरांना अटक 

तातोबा पांडुरंग गरदादे (वय 37, रा. घोरपडी) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. त्याने पत्नी मनीषा यांचा 11 एप्रिल 2017 रोजी राहत्या घरी खून केला होता. मनीषा यांच्या बहिणीने या बाबत मुंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. खटल्यात अतिरिक्त सरकारी वकील प्रेमकुमार अगरवाल यांनी काम पाहिले. मनीषा या हडपसर येथील एका नामांकित कंपनीत मोठी बहीण सुनीता यांच्याबरोबर कामास जात होत्या. मात्र तातोबाला मनीषा यांचे सुनीता बरोबर राहणे पसंत नव्हते. तो त्यांना ''सुनीता बरोबर राहू नको, तिच्याबरोबर कामाला जाऊ नको, तिच्याशी बोलू नको'' असे सांगत तिला वारंवार त्रास देत होता. तातोबाला दारूचे व्यसन होते. तसेच तो कामधंदा करीत नव्हता.

उत्साहाला गालबोट; हडसर किल्ल्यावरून पडून तरूणीचा मृत्यू!

खुनाच्या तीन दिवस अगोदर त्यांच्यात भांडणे झाली होती. त्यात मनीषा यांच्यासह दोन मुलांना मारण्याची धमकी तातोबाने दिली होती. याबाबत तिने तिच्या बहिणीलाही सांगितले होते. घटनेच्या दिवशीमनीषा या नेहमीप्रमाणे कामावरून घरी आल्या. तेव्हा तातोबा दारू पिऊन आला होता. तर मुले घरीच होती. वाद झाल्याने तातोबाने मनीषा यांना लाथा बुक्‍क्‍यांनी मारहाण केली. त्यामुळे तातोबाने खाली पडलेल्या मनीषा यांचा गळा आवळून खून केला. तसेच दोन्ही मुलांना धमकावून घराबाहेर पाठवले. त्यानंतर तातोबा बाहेर आल्यानंतर दोन्ही मुले आतमध्ये गेली असताना त्यांना त्यांची आईच्या नाका तोंडातून रक्त येत असल्याचे दिसले. मात्र मनीषा चक्कर येऊन पडल्याचा बनाव तातोबाने केला.गुन्ह्याचा तपास पोलिस निरीक्षक महेंद्र जगताप यांनी केला. खटल्यात फिर्यादी, वैद्यकीय पुरावा, मृत मनीषा यांच्या दोन्ही मुलांची साक्ष खटल्यात महत्त्वाची ठरली.

नाशिक महामार्गावर चुकीच्या दिशेने 'बाईक' आली अन्...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Pakistan Navy Collision : अरबी समुद्रात भारत-पाक नौदलाच्या जहाजांची धडक; भारताचा पाकिस्तानला तीव्र इशारा

‘आज मुश्किल से बचे...’ शहनाज गिल बसलेलं विमान हवेत जोरात हलू लागलं, अभिनेत्री प्रचंड घाबरली, Viral Video

'सरकार चर्चा करायला तयार, शिवराळ भाषा आम्ही सहन करणार नाही'

8th Pay Commission : आठव्या वेतन आयोगाकडून कर्मचाऱ्यांना मोठी अपेक्षा; 'ही' मागणी पूर्ण झाली तर दीर्घकालीन प्रतीक्षा संपणार

Marathi News Live Updates : गणपतीपुळे मंदिरात १ जानेवारीपासून ड्रेस कोड लागू

SCROLL FOR NEXT