स्वरूपसेवा संस्थेकडून पर्यटनासह ‘सेकंड होम’ची सेवा उपलब्ध
पुणे - वृद्धाश्रम आणि अनाथालयात असलेल्यांनी सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत काय करायचे, याचे नियोजन बऱ्याचदा पक्कं ठरलेलं असतं. परिस्थितीनुसार रुटीनमध्ये काही बदल होतात. मात्र, सर्वांच्याच गरजा लक्षात घेता, त्यांना सुविधा पुरवणे शक्य नसतं. अशा रुटीनमधून ज्येष्ठ आणि अनाथ बालकांना बाहेर पडत पर्यटनासह आणखी चांगले अनुभव देण्यासाठी ‘स्वरूपसेवा’ संस्थेने सेकंड होम तयार केले आहे.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
वर्षांतून किमान एखाद्या पर्यटनस्थळी जाण्याचा अनेकांचा प्रयत्न असतो. मात्र, वृद्धाश्रमात असलेले ज्येष्ठ नागरिक आणि अनाथालयातील मुलांना असे पर्यटन करता येतेच असे नाही. त्यामुळे या दोन्ही घटकांना निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या ठिकाणी काही वेळ घालवता यावा, यासाठी संस्थेचे सेकंड होम हक्काचे ठिकाण ठरत आहे. विशेष म्हणजे त्या ठिकाणी येणाऱ्या ज्येष्ठ व अनाथांचा खर्च हा संस्थेकडूनच केला जात आहे. तसेच या दोन्ही घटकांची सेवा करण्याची इच्छा असलेल्यांकडूनही यासाठी निधी उपलब्ध करून दिला जातो. रोजच्या आयुष्यापेक्षा काहीतरी नवीन आणि वेगळे क्षण पुरविण्याचे प्रयत्न संस्थेच्या माध्यमातून केले जात आहेत. याबाबत संस्थेचे समन्वयक अजित ताटे यांनी सांगितले की, वृद्धाश्रमातील नागरिक आणि अनाथांसाठी काही तरी करण्याची अनेकांची इच्छा असते.
एशाच एका गटाने या संस्थेची स्थापन केली व सेकंड होम तयार केले. सर्वसामान्य व्यक्ती त्यांना हवे तेव्हा व हवे तिथे फिरायला जाऊ शकतात. मात्र, वृद्ध मंडळी त्यांची जीवनयात्रा संपल्यावरच आश्रमातून बाहेर पडतात. अनाथांना देखील बाहेर पडण्यावर काही बंधने असतात. या दोघांनाही दैनंदिन घटनाक्रमातून काही वेगळे अनुभव देण्याचा प्रयत्न संस्थेच्या ‘मधुरांगण’ या प्रकल्पातून केला जात आहे.
रोजचे शेड्यूल बाजूला ठेवत निवांतपणे काही दिवस जगलो तर नवीन ऊर्जा मिळत असते. दोन-तीन दिवसांच्या सुटीतून मिळणाऱ्या उर्जेतून पुन्हा नव्या जोमाने काम करण्याची प्रेरणा मिळते. ही ऊर्जा ज्येष्ठ आणि अनाथांना मिळाली तर त्यांचा आनंद व उमेददेखील वाढते. त्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत.
- अजित पटेल, प्रकल्पप्रमुख, मधुरांगण
Edited By - Prashant Patil
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.