hand.jpg 
पुणे

डाॅक्टर अन् ग्रामस्थ ठरले 'त्याच्या'साठी देवदूत

सुदाम बिडकर

पारगाव : पोंदेवाडी (ता. आंबेगाव) येथील इयत्ता आठवीत शिकणाऱ्या ललित केशव बांगर या मुलाला घोणस या विषारी सापाने चावा घेतला होता. मुलाचे वडील शेतमजूर असल्याने आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. त्याच्या उपचारांसाठी ग्रामस्थांनी ४५ हजार रुपयांची रोख मदत केली अन् डॉक्टरांनी केलेल्या शर्थीच्या प्रयत्नामुळे ललितचे प्राण वाचले आहे.


मुळचे अहमदनगर जिल्ह्यातील केशव बांगर हे कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी तीन वर्षापूर्वी कुटुंबासह पोंदेवाडी येथे आले. शेताच्या कडेला गवताची झोपडी करुन राहत आहे. आठवड्यापूर्वी ललित झोपडीच्या कडेला वाढलेले गवत काढत असताना त्याच्या हाताला घोणास जातीच्या सापाने चावा घेतला. त्याला त्याच्या वडीलांनी जवळील पारगाव येथील डॉ. आशिष चव्हाण यांच्या आधार हॉस्पिटलमध्ये आणले. डॉ. चव्हाण यांनी ललितची अत्यवस्थ स्थिती पाहून कोणत्याही डिपॉझिटची अपेक्षा न करता तातडीने उपचार सुरु केले.

डॉ. चव्हाण यांनी शर्थीने प्रयत्न केल्यामुळे ललितचे प्राण वाचले. त्याला दवाखान्यातून घरी सोडण्यात आले आहे. बांगर यांची हलाखीची परिस्थिती पाहून पोंदेवाडीचे सरपंच अनिल वाळुंज यांनी ग्रामस्थांच्या मदतीने त्याच्या उपचारासाठी जमा केलेली 45 हजार रुपयांची मदत डॉ. चव्हाण यांच्याकडे आज रविवारी सुपुर्द केली. यावेळी माजी सरपंच जयसिंग पोंदे, उपसरपंच संदीप पोखरकर, सुशांत रोडे, चंद्रकांत विरकर, सुरेश नरवडे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: दरवर्षी बाळंतपण! वंशाला हवेत दोन दिवे; पाचव्यानंतर सहावं पोटात, डॉक्टरने पती-पत्नीला झापझाप झापलं; व्हिडीओ व्हायरल

'सुनेला सासरी जुळवून घे...' म्हणणं क्रूरता नाही; सुप्रीम कोर्टाचे मोठे निरीक्षण, वैवाहिक वादांत कायद्याचा गैरवापर टाळा

IPL 2026: Mumbai Indians च्या अपयशानंतर हार्दिक पांड्यानं उचललं मोठं पाऊल; जगभरातील चाहत्यांना बसला धक्का, नेमकं काय केलं?

Metro Lines 5A and 12A: कल्याण-नवी मुंबई प्रवास आणखी सोपा होणार! MMRDA नवे मेट्रो नेटवर्क उभारणार; मार्ग कसा असणार?

Pune Car Accident : पुण्यात पुन्हा 'ड्रिंक अँड ड्राईव्ह'चा थरार; दारूच्या नशेत 19 वर्षीय तरुणाने भरधाव चालवली कार, गाडी थेट गरवारे पुलावरून कोसळली खाली

SCROLL FOR NEXT