Cylinder-Rate
Cylinder-Rate 
पुणे

Video : पुन्हा चुली पेटवायच्या का? एलपीजी सिलिंडरचे दर वाढल्याने महिलांचा संतप्त सवाल

सकाळवृत्तसेवा

पुणे - सरकारने वीज, पेट्रोलचे दर वाढवले आणि आता एलपीजी सिलिंडरचे दर ५० रुपयांनी वाढवले. अशा महागाईत घरखर्च कसा भागवायचा? सरकारने चुलीवर स्वयंपाक करताना डोळ्यांतून धुरामुळे पाणी येऊ नये म्हणून एलपीजी सिलिंडर उपलब्ध करून दिले. दर वाढल्याने आम्ही पुन्हा लाकडावर स्वयंपाक करायचा का, असा सवाल गृहिणींनी उपस्थित केला.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

केंद्र सरकारने एलपीजी सिलिंडरच्या दरात ५० रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावर काही महिलांनी ‘सकाळ’कडे भावना व्यक्‍त केल्या. कोरोनाच्या कालावधीत अनेकांना रोजगार गमवावा लागला आहे. अनेकांची वेतन कपात होत आहे. अशा परिस्थितीमध्ये घरखर्च भागवणे अवघड झाले आहे. परंतु केंद्र आणि राज्य सरकार महागाई कमी करण्याबाबत गांभीर्याने लक्ष देत नाही. राज्य सरकार वीज बिलाचे दर कमी करण्यास तयार नाही. दुसरीकडे केंद्र सरकार पेट्रोल आणि गॅस सिलिंडरचे दर वाढवत आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांकडून संताप व्यक्‍त करण्यात येत आहे.

‘माझ्या कुटुंबात पाच व्यक्‍ती आहेत. पण एकच माणूस कमावणारा आहे. आम्ही काटकसर करून जीवन जगण्याचा प्रयत्न करीत आहोत. परंतु सरकार जनतेला महागाईत खाईत ढकलून देत आहे. केंद्र आणि राज्य सरकारने सरकारने वीज, पेट्रोल आणि गॅस सिलिंडरचे दर कमी करावेत.

‘मुलगी धुण्या-भांड्याचे काम करून घर सांभाळते. महागाई वाढतच चालली आहे. या सरकारने पुन्हा लाकडावर स्वयंपाक करण्याची वेळ आणली,’ अशी प्रतिक्रिया एका महिलेने व्यक्‍त केली.

Edited By - Prashant Patil

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray : राज ठाकरेंचा पुन्हा एकदा 'लाव रे तो व्हिडीओ', सुषमा अंधारेंचा जुना व्हिडीओ दाखवून उद्धव ठाकरेंना सवाल

Nashik BJP News : काँग्रेसला मोठा धक्का! प्रदेश सरचिटणीस डॉ. तुषार शेवाळे यांच्या भाजप प्रवेशाने खळबळ

Raj Thackeray In Thane: 'जोपर्यंत ठाण्यात बाहेरचे लोक आहेत, तोपर्यंत...'; राज ठाकरेंनी पुन्हा उपस्थित केला परप्रांतियांचा मुद्दा

IPL 2024 RCB vs DC Live Score : दिल्लीने आरसीबीला 200 धावांच्या आत रोखले

गोफण | भटकती आत्मा.. ऑफर नव्हे सल्ला! प्रकरण कोर्टात

SCROLL FOR NEXT