Lightbill can paid online through online Website and App during Lockdown.jpg 
पुणे

ग्राहकांनो, आता लाईटबिल भरा घरबसल्या; वाचा कसे?

सकाळवृत्तसेवा

पुणे : महावितरणच्या अभियंता व कर्मचाऱ्यांनी सध्या सुरु असलेल्या लॉकडाऊनमध्ये वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासोबतच स्वतःच्या आरोग्याची देखील काळजी घ्यावी, असे आवाहन प्रभारी प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांनी केले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

प्रादेशिक संचालक पदाचा प्रभार स्वीकारल्यानंतर नाळे यांनी व्हीडीओ कॉन्फरसिंगद्वारे पुणे, सोलापूर, सातारा, कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील महावितरणचे मंडल, विभाग, उपविभाग व शाखा कार्यालयातील सुमारे 1100 अभियंते, अधिकारी, कर्मचारी तसेच विविध कर्मचारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांशी थेट संवाद साधला. त्यावेळी त्यांनी हे आवाहन केले. 

कोरोनाशी संबंधित पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

नाळे म्हणाले, "पश्‍चिम महाराष्ट्रात वादळी पावसामुळे किंवा वीजयंत्रणेतील तांत्रिक बिघाडामुळे काही ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला होता. लॉकडाऊनमुळे काही मर्यादा असतानाही तो पूर्ववत करण्यासाठी अभियंते व कर्मचाऱ्यांनी युद्धपातळीवर केलेली कामे प्रशंसनीय आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी प्रत्येक अभियंता व कर्मचारी तत्परतेने करीत असलेली कामे कौतुकास्पद आहे. मात्र यासोबतच अभियंता, कर्मचाऱ्यांनी स्वतःच्या आरोग्याची योग्य काळजी घ्यावी.'' 

पुणेकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी; शहराचा 20 टक्के भाग आता होणार खुला

वीजग्राहकांना आवाहन करताना नाळे म्हणाले," लॉकडाऊनमध्ये वीजग्राहकांनी घरात राहून स्वतःची काळजी घ्यावी, तसेच वीजबिलांचा ऑनलाईनद्वारे भरणा करून महावितरणला सहकार्य करावे. त्यासाठी महावितरणच्या www.mahadiscom.in या वेबसाईटवर व मोबाईल ऍपवर ग्राहकांना वीजबिल पाहण्यासाठी व भरण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे. तसेच रजिस्टर्ड केलेल्या मोबाईल क्रमांकांवर वीजबिलाचा एसएमएस व रकमेचा भरणा करण्यासाठी लिंक पाठविण्यात येत आहे. या लिंकद्वारे ग्राहकांना त्यांच्या वीजबिलाची रक्कम भरण्याची थेट सोय आहे.'' 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

New Year's Eve : भारताआधी २९ देशांत होणार नवीन वर्षाचे स्वागत, जगभरात नववर्षाचे आगमन २६ तास सुरू राहणार, काय असतो टाईम झोन ? जाणून घ्या

Gold Silver Price Today : वर्षाच्या शेवटी सोने, चांदीचा दरात घसरण होणार!, चांदी वाढली सोने दरात घट...

Emergency Case मध्ये मध्यरात्रीही न्यायालय उघडणार; CJI Suryakant यांच्या ‘या’ प्लॅनमुळे संपूर्ण न्यायव्यवस्थेत मोठा बदल!

Pune News:'हडपसरच्या तीन प्रभागातून ३४८ उमेदवारी अर्ज दाखल'; ए-बी फॉर्म वाटपात आयात उमेदवारांना प्राधान्य, सर्वच पक्षांमधून नाराजीचे सूर..

Latest Marathi News Update : उत्तर भारतात थंडीचा विमानसेवेला फटका, पुण्यात ३ उड्डाणं रद्द

SCROLL FOR NEXT