Ligo Project sakal
पुणे

LIGO-India: औंढा नागनाथजवळ उभा राहतोय गुरूत्वीय लहरींच्या शोधाचा महाप्रयोग

गुरुत्वीय लहरींच्या अभ्यासासाठी अमेरिकेत लेझर इंटरफेरोमीटर ग्रॅव्हिटेशनल वेव्ह ऑब्झर्वेटरी अर्थात लायगो कार्यान्वित आहे.

सम्राट कदम

गुरुत्वीय लहरींच्या अभ्यासासाठी अमेरिकेत लेझर इंटरफेरोमीटर ग्रॅव्हिटेशनल वेव्ह ऑब्झर्वेटरी अर्थात लायगो कार्यान्वित आहे.

पुणे - गुरुत्वीय लहरींच्या अभ्यासासाठी अमेरिकेत लेझर इंटरफेरोमीटर ग्रॅव्हिटेशनल वेव्ह ऑब्झर्वेटरी अर्थात लायगो कार्यान्वित आहे. भारतातही जगातील तीसरी लायगो प्रयोगशाळा महाराष्ट्रातील हिंगोली जिल्ह्यात बांधण्यात येणार असून, नुकतीच केंद्रीय मंत्रीमंडळाने त्याला अंतिम मंजुरी दिली आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपुर्वीच आभासी पद्धतीने प्रयोगशाळेचे भूमिपुजन करण्यात आल्याची माहिती लायगो-इंडियाने दिली आहे. केवळ भारतातीलच नव्हे तर जागतिक स्तरावरील गुरूत्वीय लहरींच्या संशोधनाला यामुळे चालना मिळणार आहे.

काय आहे लायगो?

ब्रह्मांडातील महाकाय कृष्णविवरे, न्यूट्रॉन तारे आदींमधून निर्माण होणाऱ्या गुरूत्वीय लहरींचा शोध घेणारी प्रयोगशाळा म्हणजे लायगो होय. ही प्रयोगशाळा दीडशे मीटर रूंद आणि चार किलोमीटर लांबीच्या बोगद्यात उभारावी लागते.

भारतातील लायगोची पार्श्वभूमी...

अमेरिकेतील ‘लायगो’च्या जुळ्या वेधशाळांनी लावलेल्या गुरुत्वीय लहरींच्या पहिल्या शोधानंतर २०१६ मध्ये भारतात तिसरी वेधशाळा उभारण्यासाठी केंद्र सरकारने तत्त्वतः मंजुरी दिली होती. प्रकल्पाच्या नियोजनासाठी अणुऊर्जा आयोग आणि विज्ञान तंत्रज्ञान मंत्रालयाच्या विविध संस्थांमार्फत प्राथमिक निधीही उपलब्ध झाला. त्यातून गुरुत्वीय लहरींच्या वेधशाळेसाठी आवश्यक यंत्रणांची प्रारूपे तयार झाली.

हिंगोलीची निवड...

लायगोच्या बोगद्याजवळ मोठे शहर, रेल्वे रूळ नसावेत आणि भूगर्भीय हालचाली अत्यल्प असाव्यात अशी अट आहे. शास्त्रज्ञांनी अशा जागेचा देशभरात शोध घेतला. अखेर हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथजवळील जागा अधोरेखित करण्यात आली, तेथे फारशी झाडे नाहीत. त्यामुळे पर्यावरणाचा प्रश्नही निर्माण होण्याची शक्यता नाही. सुमारे १७४ एकर जागा महाप्रकल्पासाठी अधिग्रहित करून प्रशासकीय इमारतही उभी राहिली. मात्र, सन २०२० मध्ये आलेल्या करोनामुळे प्रकल्पाची अंतिम मंजुरी लांबत गेली. झालेल्या केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत लायगो इंडियाच्या उभारणीसाठी २६०० कोटी रुपयांच्या खर्चाला मंजुरी देण्यात आली.

असा असेल ‘लायगो इंडिया’ -

- पृथ्वीवर अमेरिकेच्या विरुद्ध बाजूस असणाऱ्या भारताची निवड

- औंढ्या नागनाथजवळील जागा अमेरिकेतील जागेपेक्षा हादऱ्यांच्या बाबतीत दहा पटींनी अधिक स्थिर आहे.

- अतिदूर अवकाशातील कृष्णविवर, न्यूट्रॉन तारे यांच्या संमीलनातून अवकाश आणि काळाच्या पटलावर निर्माण झालेल्या तरंगांचा अर्थात गुरुत्वीय लहरीचा वेध घेण्याचे काम वेधशाळा करेल

- पुण्यातील आंतरविद्यापीठीय खगोलशास्त्र आणि खगोलभौतिकी केंद्र (आयुका), इन्स्टिट्यूट ऑफ प्लाझ्मा रिसर्च (गांधीनगर) आणि राजा रामण्णा सेंटर फॉर ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी (इंदौर) या संस्थांच्या सहभाग.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

EPFO: महत्त्वाची बातमी! कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्ये वाढ होणार; केंद्र सरकार ईपीएफओमध्ये मोठा बदल करणार

माझ्या तोंडात शिव्या येतायत... कुंभमेळ्यासाठी झाडं तोडणाऱ्या सरकारला सयाजी शिंदेंनी विचारला जाब; आवाज उठवणाऱ्याला दाबलं जातंय...

Local Body Elections: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रद्द होणार? ५० टक्क्यांवरील आरक्षण ‘ट्रिपल टेस्ट’च्या कचाट्यात!

Latest Marathi News Live Update : अनगर नगरपंचायत तांत्रिकदृष्ट्या बिनविरोध झाली

Viral Video: मुलाच्या स्कूल बॅगमध्ये लंच बॉक्स ऐवजी नोटांचे बंडल, पाहून आईला धक्का; सत्य समजल्यावर तरळले आनंदाश्रू, हृदयस्पर्शी व्हिडिओ

SCROLL FOR NEXT