Vijay P. Bhatkar sakal
पुणे

Vijay P. Bhatkar : ‘परम’प्रमाणेच पहिला क्वांटम संगणकही पुण्यात;ज्येष्ठ संगणक शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर यांना विश्‍वास

देशाचा पहिला महासंगणक ‘परम’ प्रमाणेच पहिला क्वांटम संगणकही पुण्यातच विकसित होईल, असा विश्‍वास ज्येष्ठ संगणक शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर यांनी व्यक्त केला. क्वांटम कॉम्प्यूटरसाठी आवश्यक ‘ॲक्सलरेटर’ प्रगत संगणन विकास केंद्रात (सी-डॅक) विकसित होत असल्याची माहिती डॉ. भटकर यांनी दिली.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : देशाचा पहिला महासंगणक ‘परम’ प्रमाणेच पहिला क्वांटम संगणकही पुण्यातच विकसित होईल, असा विश्‍वास ज्येष्ठ संगणक शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर यांनी व्यक्त केला. क्वांटम कॉम्प्यूटरसाठी आवश्यक ‘ॲक्सलरेटर’ प्रगत संगणन विकास केंद्रात (सी-डॅक) विकसित होत असल्याची माहिती डॉ. भटकर यांनी दिली.

पुण्यभूषण फाउंडेशनतर्फे दिला जाणारा ‘पुण्यभूषण पुरस्कार’ डॉ. भटकर यांना संगणकशास्त्र क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल प्रदान केला जाणार आहे. शनिवारी (ता. २०) संध्याकाळी सहा वाजता बालगंधर्व रंगमंदिर येथे ‘इन्फोसिस’चे संस्थापक नारायण मूर्ती यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. यानिमित्त डॉ. भटकर यांच्या कार्यालयात आज आयोजित विशेष वार्तालाप कार्यक्रमात ते बोलत होते. पुणे ही माझी कर्मभूमी असून, ज्ञान आणि गुरू मला इथेच भेटले, असा भाव डॉ. भटकर यांनी व्यक्त केला. विज्ञानापासून ते अध्यात्मापर्यंत विविध विषयांवर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

डॉ. भटकर म्हणाले, ‘‘तंत्रज्ञान प्रचंड वेगाने बदलत असून, त्यानुसार जीवनशैलीतही आमूलाग्र बदल होत आहेत. परम संगणकाच्या निर्मितीपासून सुरू झालेला माझा माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रवास आज कृत्रिम बुद्धिमत्तेचा साक्षीदार ठरत आहे. हा संपूर्ण प्रवास अवाक करणारा असून, मी याचा साक्षीदार आहे. विज्ञानाचे अनेक दुवे आणि गाठी भविष्यात अजून उलगडणार आहेत.’’ या वेळी पुण्यभूषणचे संस्थापक-अध्यक्ष डॉ. सतीश देसाई उपस्थित होते.

मातृभाषेतील शिक्षण अभ्यासाअंती

नवीन विचार शिक्षणात येण्यासाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार आहे. सातत्याने नवे शोधण्याचा हा विचार आहे. त्यातूनच मातृभाषेतून प्राथमिक शिक्षणाचा विचार आला असून, अभ्यासाअंती ते सिद्ध झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सुप्रिया सुळेंसमोर शरद पवारांविरोधात घोषणाबाजी, फडणवीस म्हणाले, हुडदंगबाजीने काहीच मिळणार नाही, आरक्षण...

Night Milk Benefits: रोज रात्री दूध पिण्याने काय होते? जाणून घ्या शास्त्रीय आणि आयुर्वेदिक फायदे

Latest Marathi News Live Updates : शरद पवारांच्या घराबाहेर सुरक्षा वाढवली, मुंबई पोलीस सतर्क

Mumbai News: गणेश विसर्जनानंतर मुस्लिम समाजाचा जुलूस, मोहम्मद पैगंबर जन्मदिननिमित्त शासकीय सुट्टीची विनंती

Maratha Reservation : चंद्रकांत पाटील यांच्यावर मराठा क्रांती मोर्चाचे प्रत्युत्तर; मंत्रीपदासाठी समाजाशी गद्दारी न करण्याचा इशारा

SCROLL FOR NEXT