पर्यटकांचे पसंतीचे केंद्र असलेला लायन्स पॉइंट. 
पुणे

लोणावळ्यातील लायन्स पॉइंट बंद

सकाळ वृत्तसेवा

लोणावळा - थर्टी फर्स्टच्या पार्श्‍वभूमीवर अनुचित प्रकार रोखण्यासाठी पर्यटकांचे सर्वाधिक पसंतीचे ठिकाण असलेला लायन्स पॉइंट पर्यटकांसाठी तीन दिवस बंद करण्यात आला आहे. पोलिस प्रशासन आणि वनखात्याने खबरदारीचा उपाय म्हणून हे पाऊल उचलले आहे.

लोणावळ्यातील पर्यटकांचे सर्वाधिक पसंतीचे केंद्र असलेल्या लायन्स पॉइंटवर उघडपणे हुक्का विक्री व सेवन करण्याचे प्रकार सुरू होते. तेथे खुलेआम हुक्‍क्‍याचा ‘धूर’ निघत होता. या बाबत तक्रारी आल्याने सहायक पोलिस अधीक्षक नवनीत काँवत, पोलिस निरीक्षक संदीप घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली लोणावळा ग्रामीण पोलिसांनी दोन वेळा लायन्स पॉइंटवर छापा टाकून हुक्‍क्‍याचे साहित्य जप्त केले. तसेच संबंधितांवर गुन्हे दाखल केले.

वनखात्याची मालकी असलेला हा पॉइंट गेल्या काही वर्षांत अनुचित प्रकारांमुळे बदनाम होत आहे. तसेच पोलिस प्रशासनाची डोकेदुखी वाढविणारा ठरत आहे. त्यामुळे गतवर्षीही तो पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आला होता. लोणावळा परिसरात एकीकडे पर्यटकांची संख्या रोडावत आहे तर दुसरीकडे अनुचित प्रकारांमुळे पर्यटनस्थळे बदनाम होत आहे. ही महत्त्वाची स्थळे बंद होत असल्याने पर्यटन व्यवसायावर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. ‘‘गैरप्रकार टाळण्यासाठी तसेच खबरदारी म्हणून लायन्स पॉइंट बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला,’’असे वनक्षेत्रपाल संजय मारणे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran Ship Toll Plan: होर्मुज स्ट्रेटमध्ये नवा ट्रॅफिक सिस्टम लागू करणार! इराणचा मोठा निर्णय; संपूर्ण प्लॅनच सांगितला

PBKS vs RCB, Playing XI: बंगळुरूने पंजाबविरुद्धच्या सामन्यासाठी अचानक कर्णधार बदलला, खरं कारण काय?

वयाच्या ४६व्या वर्षीही मुक्ता बर्वे अविवाहित का आहे? 'या' व्यक्तीवर होता क्रश, म्हणाली, 'एखाद्याच्या आयुष्यात...

LPG ग्राहकांना मोठा दिलासा! २० हजार टन एलपीजी घेऊन जहाज भारतात दाखल, गॅस पुरवठ्याचं टेन्शन कमी होणार

'तुला मुलीच होतात, मुलगा नाही...'; म्हणत पतीनं पत्नीच्या गुप्तांगावर ॲसिड टाकलं; पुण्यातील धक्कादायक घटना

SCROLL FOR NEXT