Ramabai Ambedkar 
पुणे

रमामाईंवरील साहित्य इंग्रजीत आणणार - भीमराव आंबेडकर

सकाळवृत्तसेवा

पुणे - बाबासाहेब आंबेडकर परदेशात शिक्षणासाठी गेले असता त्याकाळात रमामाईंनी अतिशय कष्टाने, धैर्याने घर व कुटुंब सांभाळले. बाबासाहेबांचे शिक्षण अपूर्ण राहू नये, शिक्षणापासून ते विचलित होऊ नये, अशी त्यांची भूमिका होती. राष्ट्रमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले आणि रमामाई आंबेडकर या महामातांमध्ये समानतेचा धागा दिसतो तो म्हणजे या महामातांनी महापुरुष घडविले, असे प्रतिपादन रमामाई भीमराव आंबेडकर यांचे नातू भीमराव आंबेडकर यांनी केले. महामाता रमामाई यांच्यावरील साहित्य इंग्रजी भाषेमध्ये आणण्याचा आपला प्रयत्न असल्याचेही त्यांनी नमूद केले.

रमामाई आंबेडकर यांच्या १२४ व्या जयंतीचे औचित्य साधून माता रमामाई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारक समितीतर्फे रमाई महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून, या महोत्सवाचे उद्घाटन बोधीवृक्षाला जल अर्पण करून झाले. हा महोत्सव ७ फेब्रुवारीपर्यंत महामाता रमामाई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारक, वाडिया कॉलेजसमोर येथे सायंकाळी ६ ते ८ या वेळात आयोजित करण्यात आला आहे. अ‍ॅड. प्रमोद आडकर महोत्सवाचे अध्यक्ष असून, नगरसेविका लता राजगुरू स्वागताध्यक्ष तर विठ्ठल गायकवाड, मुख्य समन्वयक आहेत. उद्घाटन सोहळ्यास संत साहित्याचे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे, माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे, नगरसेवक अविनाश बागवे, कुणाल राजगुरू या वेळी उपस्थित होते.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

अभ्यासकांसमोर अडचणी 
आंबेडकर म्हणाले, ‘‘गुजरात दौऱ्यावर गेलो असता तेथील काही लोकांनी रमामाईंचे साहित्य गुजराती भाषेत नसल्याचे आपल्याला आवर्जून सांगितले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर अनेक लोकांनी अभ्यास करून डॉक्टरेट मिळविली. बाबासाहेबांचा अभ्यास करताना रमामाईंविषयी विचार होतो त्या वेळी त्यांच्यावरील साहित्य इतर भाषेत नसल्याने अभ्यासकांसमोर अडचणी येतात. त्यामुळे रमामाईंचे साहित्य विविध भाषांमध्ये आणण्याचा प्रयत्न आहे.’’

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Strike: 11 सप्टेंबरला सार्वजनिक सुट्टी नाही तरी बँका बंद! सलग 4 दिवस बँका बंद राहणार? पाहा काय सुरू राहणार

Eknath Shinde: ठाकरे गटानंतर शिंदेसेनेला धक्का, बालेकिल्ल्यातील नगरसेवकाचे पद रद्द

iPhone 18 India Price: भारत ठरला iPhone 18 खरेदीसाठी जगातील दुसरा सर्वात महागडा देश! अमेरिकेपेक्षा तब्बल 50,000 रुपये जास्त!

US Open 2026: पहाटे ३.३३ वाजेपर्यंत रंगला थरार; ४ तास २८ मिनिटांच्या लढतीनंतर शेल्टनने गतविजेत्या अल्काराझला दिला धक्का

Marathi News Live Updates : पालिकेचा विरोध डावलून कॉरिडॉर होणारच; पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या पोस्टने पंढरपुरात राजकीय वातावरण तापले

SCROLL FOR NEXT