A little girl donates her birthday money for corona fight 
पुणे

वय फक्त ५ वर्ष! कोरोना लढ्यात तिने दिले असे योगदान...

सकाळवृत्तसेवा

पुणे : देशावर ओढावलेल्या कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी हातभार म्हणून पाच वर्षाच्या चिमुकलीने बर्थडेसाठी साठवलेले पैसे पीएम आणि सीएम केअर फंडला दिले आहेत.

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे- क्लिक करा

त्रिषा पायगुडे असे या चिमुकलीचे नाव असून एक मे रोजी तिचा पाचवा बर्थडे आहे. वाढदिवस साजरा करण्यासाठी ही गेल्या काही महिन्यांपासून पैसे जमा करत होती. आई-वडील आणि नातेवाइकांच्या मागे लागून तिने पाच हजार 200 रुपये जमा केले होते. त्यातील प्रत्येकी दोन हजार 600 रुपये पीएम आणि सीएम केअर फंडला पाठवण्यात आले आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

याबाबत तिचे वडील अनिरुद्ध पायगुडे यांनी सांगितले की, ''आपल्या देशात अशा अनेक व्यक्ती आहेत ज्यांना सध्या दोन वेळचे जेवण मिळणे देखील मुश्कील झाले आहे. आम्ही मात्र घरात बसून चांगल्या पद्धतीने जीवन जगत आहोत. त्यामुळे वाढदिवसासाठी साचवलेले पैसे आपण देशाच्या हितासाठी वापरू असे मी त्रिशाला सांगितले. सुरुवातीला तिने पैसे देण्याचे नकार दिला. मात्र सर्व परिस्थिती समजावल्यानंतर ती देखील तयार झाली. त्यानुसार वाढदिवसासाठी साचवलेले पाच हजार 200 रुपये विभागून पीएम आणि सीएम केअर फंडला ऑनलाइन पाठवून दिले आहेत."

ब्रिटिश काळातही पुण्यातल्या पेठा रिकाम्या केल्या होत्या; वाचा इंटरेस्टिंग इतिहास 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uruli Kanchan Ganeshotsav security: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर उरुळी कांचनमध्ये पोलिसांचा प्रभावी रूट मार्च; कायदा-सुव्यवस्थेसाठी कडक तयारी

Pune Civic Tenders: महापालिकेच्या निविदांवर आयुक्तांचा लगाम; जुन्या निविदांतून वाढीव व नवीन कामांना बंदी

Pune Negligent Driving: सोरतापवाडी फाट्यावर टेम्पोच्या धडकेत दीड वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू; निष्काळजी चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा

Maratha Reservation : सरकारने परवानगी नाकारली; मनोज जरांगे पाटील एकटेच सहकारीसोबत मुंबईत जाणार

Pune Civic Row: स-यादीतून बाकडे, पिशव्या खरेदीला मनसेचा कडवा विरोध; महापालिका आयुक्तांकडे निवेदन

SCROLL FOR NEXT