namaz.jpg 
पुणे

मुस्लिम बांधवांनो, मशिदीत न जाता घरीच नमाज पठण होणार शक्य; वाचा ही महत्वाची बातमी

सकाळवृत्तसेवा

पुणे : कोरोना विषाणू साथीच्या पार्श्वभूमीवर सामूहिक नमाज पठण करू नये या आवाहनाचे पालन करीत पुण्यातील आझम कॅम्पस मशिदीत शुक्रवार (जुम्मा) नमाजचे 'फेसबुक लाईव्ह'द्वारे थेट प्रक्षेपण करण्यात येत आहे. मशिदीत न जाता घरी मशिदीच्या पेश इमाम यांच्या मार्गदर्शनाखाली नमाज पठण करणे नव्या तंत्रज्ञानाच्या वापराने शक्य झाले. अशा स्वरूपाचा हा पहिलाच उपक्रम आहे.

या तंत्रामुळे मशिदीत गर्दी होत नाही, फक्त पेश इमाम मशिदीतून नमाज पठण करतात आणि इतरांना घरातून त्यात सहभागी होणे शक्य होते. दर शुक्रवारी दुपारी दीड वाजता हा उपक्रम होतो. आझम कॅम्पस शैक्षणिक, सामाजिक परिवाराचे अध्यक्ष डॉ. पी. ए. इनामदार यांनी पत्रकाद्वारे या उपक्रमाची माहिती दिली.२९ मे च्या शुक्रवार पासून या उपक्रमाला सुरुवात झाली.   


एरवी शहराच्या विविध भागात मशिदींमध्ये शुक्रवार (जुम्मा) दिवशी सामूहिक नमाज पठण केले जाते. कोरोना संसर्गचा धोका लक्षात घेऊन शुक्रवारी मशिदीत जाता येत  नाही. त्यामुळे सर्वांना या फेसबुक लाईव्ह नमाज पठणाचा लाभ होत आहे. आझम कॅम्पस या फेसबुक पेजवर हे लाईव्ह प्रक्षेपण करण्यात येते. प्रशासनाने दिलेल्या सर्व सूचनांनुसार सोशल डिस्टन्स चे नियम पाळण्यात येतात. पुढील लिंकद्वारे या नमाज पठणात सहभागी होता येते.  

या आधी रमजान ईदच्या दिवशी देखील सकाळी ८ वाजता आझम कॅम्पस मशिदीमध्ये पेश इमाम असलेले मौलाना नसीम अहमद यांनी ईद साठीचे नमाज पठण केले. नेहमीच्या शिरस्त्या प्रमाणे सुरुवातीला नमाज पठण कसे करायचे याचे मार्गदर्शन करण्यात आले. मग, ईद -उल -फित्रची नमाज अदा करण्यात आली. त्यानंतर थोडक्यात खुतबा पढण्यात आला आणि दुआ सांगण्यात आली.

पेश इमाम यांच्या पाठोपाठ हे लाईव्ह प्रक्षेपण पाहणाऱ्या बांधवानी घरी  नमाज अदा केली. सुमारे ५ हजार बांधवांनी हे प्रक्षेपण सकाळच्या वेळी पाहिले होते. आझम कॅम्पसच्या माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख अमीन शेख यांनी तांत्रिक बाजू सांभाळली होती.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT