The lives of the sheep were saved from Leopard Attack in Valati Village Of Pune 
पुणे

अंधाऱ्या रात्री बिबट्या आला अन् त्यांनी....

सकाळ वृत्तेसवा

निरगुडसर : ''पहाटे तीन वाजण्याची वेळ. मेंढयांचा ओरडण्याचा आवाज ऐकताच धनगर कुटुंबातील माने दांपत्याला जाग आली आणि मेंढयावर हल्ला करण्यासाठी घुसलेल्या बिबट्याला जोरजोरात आरडाओरडा करून पळवून लावले. यात कोकराचा जीव गेला परंतु, अनेक मेंढ्यांचा जीव वाचला. 
भरधाव वाहनासमोर बिबट्या आला अन्...

दोनशेहून अधिक शेळ्यांचा जीव वाचला पण कोकरू...
वळती (ता. आंबेगाव) येथील घोटेमळ्यात सोमवारी पहाटे ​हा प्रकार घडला. घोटेमळ्यातील नंदाराम नारायण जाधव यांच्या शेतात दोन दिवसांपासून राजू माने आपली पत्नी व दोन मुलांसह (रा. चिखलदरा, जि. नगर) दोनशेहून अधिक शेळ्या व मेंढयांसह मुक्कामी होते. पहाटे तीनच्या सुमारास मेंढ्यांच्या वाड्यावर बिबट्याने हल्ला केल्याने मेंढ्या जोरजोरात ओरडू लागल्या. त्यावेळी माने दांपत्याला जाग आली. त्यांनी बॅटरीच्या उजेडात पाहिले असता बिबट्या मेंढयासाठी सभोवताली लावलेल्या वाघुराच्या आतमध्ये होता आणि त्याने सहा महिन्याच्या कोकराला पकडले होते. त्यावेळी धनगर कुटुंबियांनी आरडाओरडा केल्याने बिबट्या ते कोकरू टाकून उसात पसार झाला. 
Video : कुत्र्याला पळविणारा बिबट्या सीसीटीव्हीत कैद 

बिबट्याने केला होता घोडीवरही हल्ला
शिंगवे येथील पंडीत मळ्यात त्याच दिवशी पहाटे दोनच्या सुमारास गजू म्हस्कू करगळ यांच्या घोडीवर बिबट्याने हल्ला करून ठार मारले. घोडी ओरडल्याने कुटुंबियाला जाग आली. परंतु बिबट्याने अनेक ठिकाणी हल्ले केल्यामुळे घोडीचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच वनपाल व्ही. आर. वेलकर, वनरक्षक शिवाजी दहातोंडे, संपत भोर, शरद जाधव, सुनील गांजवे यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. घोडी ठार झाल्याने संबंधिताचे 35 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. वनविभागाने येथे पिंजरा लावून बिबट्यास जेरबंद करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rishabh Pant record: धडाकेबाज रिषभ पंतने लॉर्ड्सवर रचला इतिहास!, सर विव रिचर्ड्स यांचा 'हा' विक्रम मोडला

छत्रपती शिवरायांचा इतिहास जगभर पोहोचणार, UNESCO यादीत पन्हाळगडाचा समावेश; पालकमंत्र्यांनी 'या' घटनेची करुन दिली आठवण

Latest Marathi News Updates : उल्हासनगर स्मशानभूमीत डॉ. आंबेडकरांचा पुतळा; अनुयायांमध्ये संतापाची लाट

Crime News : नाशिक रोडवरील चोरट्यांनी आर्मी नर्सिंग परीक्षेला आलेल्या उमेदवाराला लुटले; एक लाख पाच हजारांचा ऐवज जप्त

Radhika Yadav Murder Case: राधिका यादव हत्याकांडात नवी ट्विस्ट!, टेनिस अकादमीबद्दल पोलिसांनीच केला मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT