kothrud.jpg 
पुणे

हातावरचे पोट असलेल्यांचा संसार येणार रूळावर 

जितेंद्र मैड

कोथरूड (पुणे) : लॉकडाउनच्या चौथ्या टप्प्यात बाधित क्षेत्र (कंटेन्मेट झोन) वगळून पुणे शहरातील इतर भागात जनजीवन पूर्वपदावर येत आहे. त्यामुळे छोट्या व मोठ्या व्यावसायिकांना दिलासा मिळाला आहे. दुकान सुरू झाले आणि त्यांच्या जगण्याला काडीचा आधार मिळाला. लॉकडाउनमुळे दुकानं बंद असल्याने हातावर पोट असलेल्यांचा संसार कोलमडण्याच्या मार्गावर होता. 

लॉकडाउनमधील अनुभवांबाबत नवभूमी चौकात गेली दहाबारा वर्षे चप्पल दुरुस्तीचे काम करणारे गणपत अवसरे म्हणाले की, वडील ऐंशी वर्षाचे तर आई पंच्याहत्तर वर्षाची आहे. मी आणि माझी बायको असे माझे कुटुंब इथे राहतो. मुलगा आहे पण तो वेगळा राहतो. त्याचेही काम बंद आहे. या बंदच्या काळात कोणी आम्हाला काहीही दिले नाही. तीन दिवस ठेचा खाऊन दिवस काढले. रेशनवर गहू, तांदूळ मिळाले. पण मीठ, तेल लागतेच की. त्यासाठी पैसे कुठून आणायचे. बायको धुण्याभांड्याच्या कामाला जायची. तिचे कामही बंद होते. कसं जगावं हा प्रश्न होता. आता दुकान चालू झाल्याने उदरनिर्वाहाचा प्रश्‍न मार्गी लागली आहे. 

वयाची पासष्टी ओलांडलेले मच्छिंद्रनाथ फलटणकर यांचे कोथरूड कचरा डेपो समोर पिशव्या दुरुस्तीचे दुकान आहे. गेली पंधरा वर्षे त्यांची टपरी येथे आहे. फलटणकर म्हणाले की, मी रोज एका डब्यात पाच दहा रुपयाची नाणी टाकायचो. तीच माझी बचत होती. लॉकडाउनमुळे जेवढे पैसे साठवले होते तेवढे सगळे संपले. दोन दिवसापासून दुकान सुरू केले आहे. उपजीविकेसाठी दुसरे काहीही साधन नाही. दोन चार रुपये मिळतील या आशेने रोज येतो. पत्नी दीड वर्षे कॅन्सरने आजारी आहे. पण काय करणार. मुलगा मुंबईला अडकला आहे. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे- क्लिक करा

तर दत्तात्रेय गांडले, वय 47 यांचे नंबर प्लेट टाकण्याचे दुकान कोथरूड कचरा डेपो समोर आहे. दोन महिने दुकान बंद ठेवले पण आता येथून पुढे दुकान बंद ठेवण्याची आमची ताकद नाही. उदरनिर्वाहासाठी दुसरा कोणताही पर्याय नाही. सोशल डिस्टन्स ठेवून आम्ही आमचे दुकान चालवू.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gangapur Accident: बाबरगाव फाट्याजवळ भीषण अपघात; पत्नीचा मृत्यू झाल्यानंतर दोन दिवसांनी पतीनेही घेतला अखेरचा श्वास

NDA : पुण्यात एनडीएच्या १५१ व्या तुकडीचा दीक्षान्त संचलन सोहळा उत्साहात; १,२५० छात्र सहभागी, ३६४ जण अधिकारी पदवीधर, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचे मार्गदर्शन

राहुल गांधी अन् एम. के. स्टॅलिन यांची गळाभेट! द्रमुक भूमिका बदलणार? चेन्नईतल्या बैठकीत नेमकं काय घडलं?

Electric Shock: व्यायामासाठी पहाटे घराबाहेर पडला, पण परतलाच नाही; डीपीजवळ विजेचा धक्का लागून २४ वर्षीय तरुणाचा मृत्यू

Devendra Fadnavis: स्काऊट गाईडच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी देवेंद्र फडणवीस; सदस्यसंख्या ५ कोटींवर नेण्याचा निर्धार

SCROLL FOR NEXT