local resident and the competition examination students have a heated argument in Pune 
पुणे

पुण्यातील पेठांत पेटतोय नवा वाद; स्थानिक रहिवासी विरुध्द स्पर्धा परीक्षा विद्यार्थी

महेश जगताप

स्वारगेट(पुणे) : कोरोना महामारी रोग ओसरल्यानंतर अभ्यासिका व ग्रंथालये योग्य ती काळजी घेऊन पेठ भागात चालू केलेली आहेत .त्यामुळे विद्यार्थीही गावाकडून अभ्यासासाठी परतत आहेत, मात्र कोरोनाच्या नावाखाली सदाशिव पेठेत अभ्यासिका चालकांना आणि विद्यार्थ्यांना धमकावण्याचे प्रकार होत 
आहेत. त्यामुळे विद्यार्थी आणि स्थानिक असा वाद निर्माण होत आहे .

''वारंवार अभ्यासिकेत येणे, काही कारण नसताना अभ्यासिका चेक करणे, तुम्हाला अभ्यासिका चालू करायला कोणी परवानगी दिली, तुम्ही अभ्यासिका बंद करा नाहीतर मी पोलीस घेऊन येईल, मी वकील आहे, पाहिजे ते करू शकतो'' अश्या प्रकारच्या धमक्या अभ्यासिका चालकांना दिल्या जात आहेत .रस्त्यावर जरी उभारले तरी तुम्ही येथून चालते व्हा आशा तुच्छ भाषेत विद्यार्थ्यांचा अपमान करण्यात येत आहे .असे मनोगत सकाळशी बोलताना विद्यार्थ्यांनी मत मांडले .

Video : पुण्यात पुन्हा शिरला गवा; बावधन परिसरात उडाली खळबळ
पेठेतील एक वकील त्रास देत असल्याने विद्यार्थी त्रासून गेले आहेत .त्याच बरोबर अभ्यासिका चालकही आत्ताच कोरोनाच्या आर्थिक धक्क्यातून बाहेर येत असताना असा त्रास सहन करावा लागत आहे. हे स्थानिक पोलिसांना हाताला धरून करत असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे याबाबत आम्हला त्रास देणाऱ्या व्यक्तीवर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. 


''परीक्षा कधीही होऊ शकतात त्यामुळे आम्ही अभ्यासिकेत सातत्याने जात असतो. आमचा कोणालाही त्रास नसताना पण, काही स्थानिक रहिवाशी आम्हाला विनाकारण त्रास देत आहेत. मी वकील आहे, तुमचे काहीही करू शकतो अश्या प्रकारच्या धमक्याही काही स्थानिकांकडून दिल्या जातात. वारंवार पोलिसांकडे जाणे त्यांना अभ्यासिकेत घेऊन येणे हा प्रकार सातत्याने होत आहे. याला वेळीच प्रशासनाने रोखले पाहिजे नाहीतर, स्थानिक आणि विद्यार्थी असा वाद वेगळे वळण घेऊ शकतो''
- किरण डोके, विद्यार्थी
 

''आमचा त्यांच्या व्यवसायाला किंवा विद्यार्थ्यांना विरोध नाही तर त्यांच्या बेशिस्तपणाला आहे .अनेक विद्यार्थी सोसायटीच्या गेट समोर घोळका करून उभारतात तर काही अश्लील चाळे करतात हे थांबले पाहिजे.''

- अभिषेक उपाध्ये, वकील स्थानिक नागरिक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FD Interest Rate: 1 लाखांची FD कुठे केल्यास मिळणार सर्वाधिक व्याज? 'या' 3 बँका देताहेत 8% पेक्षा जास्त व्याज!

Nvidiaच्या जेन्सन आणि अ‍ॅलिसची ओळख तिच्या पतीनेच करून दिलेली, कोण आहे कांग वेई? चीनमध्ये ८० हजार कोटींचा व्यवसाय

शेणाने सारवली घराची जमीन, अभिनेत्रीचा व्हिडीओ व्हायरल; म्हणाली, 'यात नवल काहीच नाही'

Latest Marathi News Live Update : सातारा जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाचा आज फैसला; सत्तेसाठी महायुतीत रस्सीखेच

Cabinet Reshuffle : कोणत्या मंत्र्यांचे पद जाणार, कोणाला मिळणार संधी? मोदींनी अचानक बोलावली बैठक! मंत्रिमंडळात मोठे फेरबदल होणार?

SCROLL FOR NEXT