lock down impact restaurants cafe resale social media advertising
lock down impact restaurants cafe resale social media advertising 
पुणे

कोरोनाचा दणका : पुण्यात अनेकांनी रेस्टॉरंट्स, कॅफे काढली विकायला!

सकाळ डिजिटल टीम

पुणे : कोरोना व्हायरस आणि त्याच्या बरोबरीनं आलेल्या लॉकडाउनचा सर्वाधिक फटका बहुदा हॉटेल व्यवसायाला बसलाय. पुण्यात अनेकजण मेस आणि छोट्या, मोठ्या कॅफे रेस्टॉरंट्सवर अवलंबून होते. सध्या मेस तर पूर्णपणे बंद आहेत. तर, छोटी रेस्टॉरंट्स आणि कॅफे विकण्याची वेळ आलीय. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याच्या जाहिराती सुरू आहेत. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

मराठमोळ्या पुण्यात कॉस्मो कल्चर झपाट्यानं रुजलं. शिक्षण आणि आयटी क्षेत्राच्या माध्यमातून पुण्यात देशाच्या आणि जगाच्या कानाकोपऱ्यातून तरुण रहायला आले. सोबत आपली खाद्य संस्कृती घेऊन आले. शहरात कॉलेज, विद्यापीठं यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर तरुण आल्यानं, गेल्या काही वर्षांत शहरात कॅफे आणि रेस्टॉरंट्सची संख्या वाढली. यात अनेक तरुणांनी आणि स्थानिकांनी गुंतवणूक करून, मिळेल त्या जागेत चहा-कॉफी आणि स्नॅक्सची ठिकाणं सुरू केली. मागणी एवढी होती की, थोडीफार चव असलेल्या, चांगला ऍम्बियन्स असलेल्या कॅफेंना रिस्पॉन्सही मिळू लागला. पण, कोरोना आणि त्याच्यासोबत आलेल्या लॉकडाउननं या छोट्या कॅफेंचं अक्षरशः कंबरडं मोडलंय. यातल्या बहुतांश कॅफे आणि रेस्टॉरंट् मालकांनी ती विकायला काढली आहे. फर्निचर, किचन सेटअप, इतर साहित्य विकण्यासाठी आता मालकांनी जाहिराती करायला सुरुवात केलीय. Pune Eat Outs, Pune Veg Eat Outs अशा फेसबुक पेजेसवर मोठ्या प्रमाणावर रिसेलच्या जाहिराती दिसत आहेत. यासह क्विकर, पॉइंट ऑफ सेल, अशा स्वरूपाच्या वेबसाईट्सवरही पुण्याच्या जाहिराती दिसू लागल्या आहेत.

स्टार्टअपला फटका
गेल्या काही वर्षांत आयटी क्षेत्रातीलच अनेक तरुणांनी एकत्र येत पुण्यात काही कॅफे आणि खाण्याची ठिकाणं सुरू केली होती. त्यांना सगळ्यांत मोठा दणका बसल्याचं या क्षेत्रातील लोक सांगतात. या कॅफेंमध्ये काम करणारे बहुतांशजण परप्रांतीय होते. लॉकडाउनच्या काळात त्यांनी गावाची वाट धरली आणि या कॅफेंमध्ये काम करण्यासाठी कोणी राहिलच नाही. भाड्यानं जागा घेतल्या असल्यानं आणि ग्राहकच नसल्यामुळं जागेचं भाडं तरी कसं द्यायचं? असा प्रश्न या कॅफेमालकांसमोर आहे. त्यामुळंच त्यांनी सोशल मीडियावर जाहिराती करण्यास सुरुवात केलीय. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

काय विकलं जातं?

  • संपूर्ण रेस्टॉरंट किंवा कॅफे सेटअप
  • हॉटेल कॅफेमधील फर्निचर (टेबल, खुर्च्या)
  • किचन सेट अप (स्टिल फर्निटर)
  • किचनमधील इतर साहित्य (चमचे, प्लेट्सपासून अनेक गोष्टी) 
  • फूड सर्व्हिस लायसन्स, बार लायसन्स
     

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chhagan Bhujbal: "काँग्रेस मला मुख्यमंत्रीपद देण्यास तयार होती, मात्र मी..."; भुजबळांची शरद पवारांच्या गौप्यस्फोटावर प्रतिक्रिया

SRH vs PBKS Live Score : हैरदाबादचा डोळा दुसऱ्या क्रमांकावर; पंजाबचा नवा कर्णधार शेवट गोड करण्यासाठी उत्सुक

Anil Kapoor : "सहजीवनाची 51 वर्षं..."; लग्नाच्या वाढदिवसाला अनिल यांची पत्नीसाठी इमोशनल पोस्ट

Soni Razdan: आलिया भट्टच्या आईसोबत फसवणुकीचा प्रयत्न; म्हणाल्या, "त्यांनी मला फोन केला आणि..."

RCB vs CSK : आरसीबीपाठोपाठ जिओ सिनेमाचीही बल्ले-बल्ले, मिळाली छप्पर फाड के व्ह्युवरशिप; सगळे रेकॉर्ड ब्रेक

SCROLL FOR NEXT