baramati
baramati 
पुणे

बारामतीकरांचं पण ठरलं, गुरुवारपासून शहरात लॉकडाउन

मिलिंद संगई

बारामती (पुणे) : बारामती शहरातील कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या विचारात बारामती शहरात गुरुवारपासून (ता. 16) लॉकडाउन जाहीर करण्यात आले आहे. पुढील आदेश येईपर्यंत बारामतीतील लॉकडाउन सुरुच राहिल, अशी माहिती उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांनी दिली. वैद्यकीय व अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व व्यवहार पूर्णपणे बंद राहणार आहेत. 

बारामतीत काल एकाच दिवसात 18 रुग्ण सापडले. आज बारामतीत 5 रुग्ण सापडले. दोन दिवसात 23 रुग्ण सापडल्यानंतर आता ही साखळी तोडण्यासाठी लॉकडाउन जाहिर करण्यात आले आहे. बारामतीतील व्यवहारांवर कालपासूनच दुपारी तीन वाजेपर्यंत निर्बंध आणले होते. आज मात्र लोकभावनेचा दबाव विचारात घेता प्रशासनाने लॉकडाउनचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार नागरिकांना बुधवारी मध्यरात्री बारा वाजेपर्यंत नियमीतपणे कामे करता येतील. त्यानंतर लॉकडाउन सुरू होईल. 

याबाबत पुढील परिस्थितीचा विचार करून लॉकडाऊन कधी संपवायचा, याचा निर्णय घेतला जाणार आहे. मात्र, कोरोनाची साखळी तुटावी व समूह संसर्गाचा धोका होऊ नये, या उद्देशाने हा निर्णय घेतला आहे. बुधवारी मध्यरात्री बारा वाजल्यापासून संपूर्ण बारामती शहर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहिर करण्यात आले आहे.
  
Edited by : Nilesh Shende

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UAPA: ओसामा बिन लादेनचे फोटो, ISIS चे झेंडे बाळगणे गुन्हा नाही: हायकोर्ट

Viral: पवार गटाचं काम करणाऱ्याला दत्ता भरणे यांच्याकडून शिवीगाळ? व्हिडिओ रोहित पवारांकडून शेअर

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : महाराष्ट्रात 11 वाजेपर्यंत 18.18 टक्के मतदान; बारामतीमध्ये सर्वात कमी मतदानाची नोंद

Baramati lok sabha: मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे का पोहचल्या अजित पवारांच्या निवासस्थानी? भेटीमागे नेमकं काय दडलंय?

Latest Marathi News Live Update: 'पन्नू हत्येप्रकरणी भारताच्या तपास अहवालाची वाट पाहतोय': अमेरिका

SCROLL FOR NEXT