manchar.jpg 
पुणे

मंचरकरांसाठी महत्त्वाची बातमी : शहरात लॉकडाउन वाढविण्यात आला; कधीपर्यंत असणार लॉकडाउन ​वाचा सविस्तर

डी. के. वळसे पाटील

मंचर (पुणे) : मंचर शहरात कोरोनाने थैमान घातले आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामस्थ व व्यापाऱ्यांनी कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी गुरुवारपर्यंत (ता. 17) शहरात पुन्हा लॉकडाउन वाढविण्याचा निर्णय घेऊन अंमलबजावणी सुरु केले आहे. यापूर्वी शनिवार (ता. 5) ते शुक्रवारपर्यंत (ता. 11) शहर बंद ठेवले होते. 
मंचर शहरात गेली दोन दिवस धारावी पॅटर्नप्रमाणे जम्बो सर्वेक्षण करण्यात आले. कोरोनाचे संकट आटोक्यात आणण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयात बैठक झाली.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

भीमाशंकर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे, अरुणा थोरात, राजाराम बाणखेले, बाळासाहेब बाणखेले, दत्ता गांजाळे, संजय थोरात, राजू इनामदार, अल्लू इनामदार, वसंतराव बाणखेले, युवराज बाणखेले, अजय घुले, राजेंद्र थोरात, महेश मोरे, ग्रामस्थ व व्यापारी उपस्थित होते. त्यात गुरुवारपर्यंत (ता. 17) शहर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. 

 

मंचर शहरात गेल्या दोन दिवसात 30 हजार नागरिकांच्या केलेल्या सर्वेक्षणात 210 जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. आतापर्यंत एकूण पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांची संख्या 758 झाली आहे. 372 जण अवसरी खुर्द येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय कोविड सेंटर, मंचर उपजिल्हा रुग्णालय, भीमाशंकर हॉस्पिटल येथे उपचार घेत आहेत. नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे. 
- सचिन उंडे, ग्रामविकास अधिकारी, मंचर 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jitendra Awhad: छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आव्हाडांचे वादग्रस्त विधान; विधानसभेत गदारोळ

घरकूल लाभार्थीकडून 12,000 लाच घेणारा ग्रामसेवक व शिपाई पकडला! 20 हजाराची मागणी, 15 हजार द्यायचे ठरले अन्‌ 12 हजार घेतले, वाचा...

Pune Crime: पुण्यात अपघाताच्या बहाण्याने वाहनचालकांना लुटणारे मेरठचे दोघेजण गजाआड; गाडी पायावरून गेल्याचा बनाव अन्..

बापाचाच लेकीवर अत्याचार! अल्पवयीन मुलगी गर्भवती, आजारी असल्याने माढ्यातील दवाखान्यात गेली, डॉक्टरांनी तपासणी केली अन्‌...

Pune News: पुणे महापालिकेने केली तब्बल ८०० कोटीची करमाफी; चार महिन्यात १ हजार ७० कोटीची वसूली, काय आहे अभय योजना?

SCROLL FOR NEXT