Congress
Congress 
पुणे

Loksabha 2019 : काँग्रेसचा घोळ मिटेना

सकाळवृत्तसेवा

पुणे - लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचे नगारे वाजत असूनही, पुण्यातील काँग्रेसच्या उमेदवारीचा गोंधळ शनिवारी रात्रीपर्यंत संपला नाही. संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने त्यांची उमेदवारी निश्‍चित असल्याची चर्चा आहे. काँग्रेसचे नेते आणि राज्याचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे मुंबईत येऊनही उमेदवाराचे नाव घोषित झाले नाही.

त्याचवेळी पुण्यातील काँग्रेस भवनात बैठका सुरू होत्या; दुसरीकडे मात्र गेले काही दिवस उत्साह अनुभवलेल्या काँग्रेस भवनचा परिसर सायंकाळनंतर सुनासुना होता.

सत्ताधारी भाजपने पालकमंत्री गिरीश बापट यांची उमेदवारी जाहीर करूनही आठवडा झाला. त्यामुळे त्यांच्याविरोधात काँग्रेसकडून कोण असेल, याची उत्सुकता राजकीय वर्तुळात आहे. 

महापालिकेतील गटनेते अरविंद शिंदे यांच्यावर एकमत झाल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. तेव्हाच शिंदे यांनी प्रचाराला प्रारंभ केला. परंतु, गेल्या ७२ तासांत शिंदे यांचे नाव जाहीर करण्यात आलेले नाही. त्यामुळे काँग्रेसच्या उमेदवारीची माळ कोणाच्या गळ्यात पडेल, याकडे लक्ष लागले आहे. त्यातच, पक्ष प्रवेश होताच गायकवाड यांना उमेदवारी मिळेल, अशी चर्चा रंगली. मात्र, उमेदवाराचे नाव हे दिल्लीतून जाहीर करण्यात येईल, असे सांगत खर्गे दुपारी दिल्लीकडे रवाना झाले. त्यानंतर सातपर्यंत उमेदवारी जाहीर होण्याची आशा होती. मात्र, रात्री उशिरापर्यंत ती होऊ शकली नाही.

सर्वेक्षणाचा कल ठरविणार उमेदवार?
पुण्यात काँग्रेसमध्ये प्रवीण गायकवाड, अरविंद शिंदे आणि मोहन जोशी या तिघांच्या नावात मोठी रस्सीखेच आहे. या तिघांची नावे पक्षश्रेष्ठींकडे असून, नावांमध्ये एकमत होत नसल्याने शेवटी मतदारांचा कल या तिघांपैकी कोणाला आहे, याचे सर्वेक्षण घेण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला. गेल्या दोन दिवसांत एका खासगी संस्थेकडून हे सर्वेक्षण करण्यात आले असून, त्याचा अहवाल रात्री काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडे गेला आहे. त्यात ज्या उमेदवाराला सर्वाधिक पसंती मिळाली असेल, त्याचे नाव अंतिम करण्यात येईल, असा निर्णय झाल्याचे समजते. या सर्वेक्षणामुळेच काँग्रेसने पुण्याचा निर्णय लांबविला होता.

स्थानिकांकडून प्रचाराचे नियोजन
उमेदवाराच्या नावाची वाट न पाहता काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी प्रचाराचे नियोजन केले आहे. त्यासाठी गेल्या काही वर्षांत पहिल्यांदाच जुन्या कार्यकर्त्यांना बैठकीसाठी बोलविण्यात आले. विशेषतः गेल्या २० वर्षांत काँग्रेसच्या तिकिटावर महापालिका, विधानसभेच्या निवडणुका लढविलेले कार्यकर्ते उपस्थित होते. उद्या (रविवारी) दुपारी साडेचारला कसबा गणपतीपासून प्रचाराला प्रारंभ करण्यात येणार असल्याचे शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Loksabha : पंतप्रधान मोदींची उद्या पुण्यात सभा ; सुमारे दोन लाख नागरिक उपस्‍थित राहणार,भाजपचा दावा

IPL, LSG vs RR: संघाचा विजय, पोराची पहिली फिफ्टी अन् कुटुंबाचं सेलिब्रेशन; पाहा राजस्थानच्या जुरेलचा स्पेशल Video

Apple Bug : अ‍ॅपलच्या यूजर्सना भेडसावतेय वेगळीच समस्या; रिसेट करावा लागतोय Apple ID पासवर्ड

लग्नाच्या दिवशी नवऱ्या मुलाने केली मोठी चूक; नवरीमुलीने थेट लग्न मोडलं

Latest Marathi News Live Update: मध्य रेल्वेच्या ३० समर स्पेशल ट्रेनला मुदतवाढ

SCROLL FOR NEXT