Police Bandobast
Police Bandobast 
पुणे

Loksabha 2019 : मोजणीसाठी मोठा बंदोबस्त

सकाळवृत्तसेवा

पिंपरी - शिरूर आणि मावळ लोकसभा मतदारसंघांची मतमोजणी बालेवाडी येथे होत आहे. यासाठी ७७ पोलिस अधिकारी आणि ८०० कर्मचारी बंदोबस्तासाठी असतील. तसेच, पिंपरी-चिंचवड शहरातील गस्त वाढविण्यात येणार आहे.

संवेदनशील ठिकाणी बंदोबस्त असणार आहे. अतिरिक्‍त आयुक्‍त मकरंद रानडे यांची या सर्वांवर देखरेख असेल. दरम्यान, दिवसभर शहरातील सर्व दारूची दुकाने बंद राहणार आहेत. राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून शहरात दोन पथके गस्त घालणार आहेत.

मतमोजणी केंद्राच्या आतील बाजूस असलेल्या बंदोबस्ताच्या प्रभारी उपायुक्‍त नम्रता पाटील असतील. त्यांच्यासोबत दोन सहायक आयुक्‍त, चार निरीक्षक, १२ सहायक निरीक्षक, उपनिरीक्षक आणि ८० कर्मचारी असणार आहेत. उपायुक्‍त विनायक ढाकणे हे स्ट्राँगरूम आणि मुख्य प्रवेशद्वाराच्या बंदोबस्ताचे प्रभारी असतील. त्यांच्या मदतीला दोन सहायक आयुक्‍त, तीन निरीक्षक, दहा सहायक निरीक्षक, उपनिरीक्षक, १०० कर्मचारी राहतील.

वाहतूक नियंत्रणासाठी सहायक आयुक्‍त नीलिमा जाधव, दोन निरीक्षक, सहा सहायक निरीक्षक, ३० कर्मचारी आहेत. याशिवाय मतमोजणीच्या ठिकाणी विशेष शाखेचे एक सहायक आयुक्‍त, दोन निरीक्षक, सहा सहायक निरीक्षक आणि ४० कर्मचारी साध्या वेशात असणार आहेत. 

मतमोजणीच्या ठिकाणी किंवा मतमोजणी केंद्राच्या बाहेर काही अनुचित प्रकार घडल्यास तातडीच्या मदतीसाठी बालेवाडी येथे नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. याठिकाणी एक निरीक्षक, दोन सहायक निरीक्षक आणि २० कर्मचारी राखीव असणार आहेत. स्ट्राँगरूमच्या बंदोबस्तासाठी सीआरपीएफ आणि राज्य राखीव दलाच्या प्रत्येकी दोन प्लाटून (५६ कर्मचारी) बंदोबस्तासाठी असतील. याशिवाय, हिंजवडी पोलिस ठाण्याकडून दोन निरीक्षक, १० सहायक निरीक्षक आणि ५० कर्मचाऱ्यांचा अतिरिक्‍त बंदोबस्त असणार आहे.

निकालांचा कल येताच काही ठिकाणी जल्लोष साजरा होण्याची शक्‍यता गृहीत धरून शहरातील काही ठिकाणी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. राजकीय पक्षांची कार्यालये, उमेदवारांची निवासस्थाने येथेही बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. कुठेही अनुचित घटना घडू नये, म्हणून शहरातील गस्त वाढविण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT