Chandrashekhar Bawankule sakal
पुणे

BJP Manifesto : विकसित पुणे घडविणारे ‘संकल्पपत्र’ भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते प्रकाशित

‘नरेंद्र मोदींनी विकसित भारताचे संकल्पपत्र जाहीर केले. त्याच प्रमाणे मोहोळ यांची त्यांचे संकल्पपत्र जाहीर केले आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - पुरंदर येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाचा पाठपुरावा करणार...मेट्रोचा १५० किलोमीटर पर्यंत विस्तार... महिलांसाठी सुरक्षित शहर ओळख कायम ठेवणार... अशी आश्वासने देणारा व त्यावर प्रत्यक्षात काम करण्याची हमी देणारे, विकसित भारतासोबत विकसित पुणे घडविणारे ‘संकल्पपत्र’ आज (ता. ८) भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आले.

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, ‘नरेंद्र मोदींनी विकसित भारताचे संकल्पपत्र जाहीर केले. त्याच प्रमाणे मोहोळ यांची त्यांचे संकल्पपत्र जाहीर केले आहे. मोदी यांनी पुण्यासाठी जो शब्द दिला तो पूर्ण केला आहे. २०२४-२०२९ या कालावधीतही केला जाईल.

मुरलीधर मोहोळ म्हणाले, ‘पुण्याच्या दीर्घकालीन विकासासाठी संकल्पपत्र तयार करण्यात आले आहे. विकास आणि पर्यावरण याचा समतोल राखला जाईल. या जाहीरनाम्यात नागरिकांच्या अपेक्षा काय आहेत. याचाही समावेश केला आहे.

डीजेचा वापर थांबवा

मोहोळ यांनी प्रकाशित केलेल्या संकल्पपत्रामध्ये नागरिकांच्या काय मागण्या आहेत, शहरात कोणती कामे प्राधान्याने झाली पाहिजेत याचा समावेश केला आहे. यामध्ये गृहनिर्माण सोसायटीने दर तीन महिन्यांची वृक्षारोपण करावे, सार्वजनिक उत्सवांमधील डीजेचा वापर थांबवावा, पाण्याची नासाडी रोखण्यासाठी गळणारे नळ, फुटक्या जलवाहिन्या, गळते टँकर यांच्यावर अंकुश ठेवावा.

केंद्र व राज्य सरकारांच्या मोकळ्या जागांवर वनीकरण करावे, शहरात मोठा पाऊस पडला की लगेच शहर तुंबत हे, त्याचे त्यावर उपाययोजना कराव्यात, सार्वजनिक शौचालयांची दर चार तासांनी व्हावी आदी सूचनांचा समावेश या संकल्पपत्रात केला असून, त्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे मोहोळ यांनी सांगितले.

संकल्पपत्रातील प्रमुख आश्‍वासने

- केंद्राच्या निधीतून ‘पीएमपी’च्या ताफ्यातील इलेक्ट्रिक बसेस ३ हजारावर नेणार

- ‘हरित आच्छादना’चा समतोल राखणारे नियोजन करणार-

- पुणे मेट्रो प्रकल्पाचा विस्तार करून मेट्रोचे जाळे १५० किलोमीटरपर्यंत वाढविण्यासाठी पाठपुरावा

- मेट्रोचा वापर वाढविण्यासाठी लास्ट माईल कनेक्टिव्हिटी मजबूत करणार

- पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी पाठपुरावा करणार

- पुण्यातील प्रधानमंत्री आवास योजनेचे उद्दिष्ट पूर्ण करण्याला प्राधान्य देणार

- महिलांसाठी सर्वात सुरक्षित शहर ही पुण्याची ओळख कायम ठेवणार

- पुण्यात जीएसटी न्यायाधिकरण स्थापन करण्यासाठी प्रयत्न

- नदीपात्रात जाणारा पाण्याचा प्रत्येक थेंब प्रक्रिया करूनच जाईल

- शहराच्या दीर्घकालीन हितासाठी थिंकटँक स्थापन करून नियमित संवाद साधणार

- ससून रुग्णालयात रुग्णांच्या सुविधेसाठी खासदार मदत कक्ष सुरू करणार

- वेगाने विकसित होणाऱ्या स्टार्टअप इकोसिस्टीमला प्रोत्साहन देणार.

- विविध कंपन्यांच्या ‘सीएसआर’ निधीतून तरुणांसाठी स्किल डेव्हलपमेंट कार्यक्रम राबविणार

- राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातर्फे शहरातील विविध महामार्ग, रस्ते जोडणार

- लोहगाव विमानतळाची धावपट्टी वाढविणार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Bar Strike : मद्यपींसाठी महत्त्वाची बातमी! राज्यभरातील बार उद्या राहणार बंद; HRAWI चा जाहीर पाठिंबा, काय आहे कारण?

Kolhapur : ए. एस. ट्रेडर्सच्या माध्यमातून कोल्हापूर व बेळगावातील गोरगरिबांना लुटायचा, पोलिसांनी ट्रॅप लावून मुख्य एजंटला केली अटक

Flight Cancellation:'तांत्रिक कारणामुळे गोव्यातून विमानाचे उड्डाण रद्द'; ५९ प्रवासी सोलापूर विमानतळावरून परतले; नाईट लॅंडिंग नसल्याने गैरसोय

Latest Marathi News Updates : मराठीबहुल मतदारसंघातील लोकप्रतिनिधींना भेटणार; महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचा निर्णय

Solapur: गावगाड्याच्या राजकारणाचा उडणार ‘धुरळा’; सोमवारी झेडपीची प्रारूप प्रभागरचना, मंगळवारी सरपंचाची आरक्षण सोडत

SCROLL FOR NEXT