big information in bhushi dam tragedy ansari family drowned shocking reason  Esakal
पुणे

Lonavala Video: लोणावळ्यातील 'त्या' भीषण व्हिडिओची प्रशासनाकडून गंभीर दखल; पर्यटनासाठी जाहीर होणार गाईडलाईन्स

पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी नियमावलीकडं दुर्लक्ष करणाऱ्या पर्यटकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

मावळ : लोणावळ्यातील भुशी डॅम इथं वर्षाविहारासाठी गेलेल्या एका कुटुंबातील पाच जण पाण्यात वाहून गेल्याचा थरकाप उडवणारा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओची गंभीर दखल प्रशासनानं घेतली असून संध्याकाळी सहानंतर राज्यातीलल सर्वच पर्यटनस्थळी पर्यटकांना बंदी असणार आहे.

या पार्श्वभूमीवर पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी मोठा निर्णय घेतला असून लवकरच लोणावळ्यातील पर्यटनासाठी गाईडलाईन्स जाहीर होणार आहेत. (Lonavala Bhushi Dam Video New Guidelines will be announced for tourism says Pune District Collector Suhas Divase)

साम टीव्हीच्या वृत्तानुसार, लोणावळ्यातील धबधब्यात अन्सारी आणि सय्यद कुटुंबीय वाहून गेल्यानं पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. याच अनुषंगानं थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याप्रकरणी कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत.

त्यामुळं आता संध्याकाळी सहानंतर पर्यटकांना पर्यटनस्थळी फिरण्यास मज्जाव करण्यात आला आहे. याकडं दुर्लक्ष करणाऱ्या पर्यटकांना आणि कारवाईत हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे, अशी माहिती पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी दिली. पुढच्या काही तासांत लोणावळ्यातील पर्यटनासाठी विशेष नियमावली जाहीर केली जाणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT