लोणावळा - मुख्याधिकारी सचिन पवार यांनी अर्थसंकल्पाची प्रत नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांच्याकडे सुपूर्त केली. या वेळी उपस्थित नगरसेवक.
लोणावळा - मुख्याधिकारी सचिन पवार यांनी अर्थसंकल्पाची प्रत नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांच्याकडे सुपूर्त केली. या वेळी उपस्थित नगरसेवक. 
पुणे

आरोग्य, स्वच्छतेसाठी १० कोटी

सकाळवृत्तसेवा

लोणावळा - लोणावळा नगरपालिकेचा २०१९-२० या वर्षासाठी १०४ कोटी ९३ लाख ३६ हजार ४५२ रुपयांचा, तर ५० लाख रुपयांच्या शिलकी अंदाजपत्रकास लोणावळा नगरपालिकेच्या विशेष सर्वसाधारण सभेत मान्यता देण्यात आली.

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा सर्वसाधारण व भांडवली जमा-खर्चात एक कोटी रुपयांची वाढ सुचविली. मुख्याधिकारी सचिन पवार, नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांनी सोमवारी (ता. १८) नगरपालिकेच्या सभागृहात अर्थसंकल्प सादर केला. भांडवली व महसुली जमापैकी निम्मी रक्कम सामान्य प्रशासनावरच खर्च करण्यात येणार आहे. नगरपालिकेच्या इतिहासातील सर्वांत मोठा अर्थसंकल्प सादर झाला असला तरी महसुली उत्पन्नातून संकलित कर, पाणीपट्टी आदींसह २५ कोटी रुपयांचे उत्पन्न अपेक्षित धरले आहे.

विकास कामांसाठी अनुदान व अंशदानपोटी १० कोटी तीन लाख अपेक्षित जमेची बाजू दर्शविली आहे. नगरपरिषदेने अग्निशमन कर दोन कोटी ५५ लाख अपेक्षित धरले असून नगरपालिकेचे मिळकती भाडे, ठेवींवरील व्याज, सांडपाणी व्यवस्थापन व घनकचरा व्यवस्थापन करासह मालमत्ता हस्तांतर शुल्क, विविध दाखले, ना हरकत परवाने यांच्या शुल्क वाढीचा पर्याय सभागृहापुढे ठेवला. जाहिरात फी, पाणी विक्री, टॅंकर्स फी कराच पर्याय नगरपालिकेकडे आहे. 

५० लाख रुपयांच्या शिलकी अंदाजपत्रकात महसुली खर्चातून करण्यात येणारा प्रशासकीय खर्च ५० टक्‍क्‍यांपुढे असून, शहरात सध्या सुरू असलेल्या विविध विकास योजना व प्रकल्पांसाठी राज्य व केंद्र सरकारच्या वैशिष्ट्यपूर्ण अनुदानांवर नगरपालिकेस अवलंबून राहावे लागणार आहे.

नगरपालिका मालमत्ता भाडे, हस्तांतर फी, दुकाने भाडे, अतिक्रमण फी आदी विविध भाड्यापोटी उत्पन्न अपेक्षित आहे. यामुळे नगरपालिकेच्या उत्पन्नात सुमारे एक ते दीड कोटींची वाढ होऊ शकते, असा विश्‍वास मुख्याधिकारी सचिन पवार यांनी व्यक्त केला.

प्रमुख तरतुदी 
 १०४ कोटी ९३ लाख ३६ हजार रुपयांचा अर्थसंकल्प
 ५० लाख ६ हजार ४५२ रुपयांची शिल्लक
 महसुली जमा ६९  कोटी २६ लाख रुपये मिळणार
 नगर परिषद दर व करातून उत्पन्न १६ कोटी ५० लाख
 विविध अनुदानांतून अपेक्षित २१ कोटी 
 आरोग्य व स्वच्छतेसाठी १० कोटींची तरतूद
 सामान्य प्रशासन व कर्मचाऱ्यांचे पगार १५ कोटी 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange : मनोज जरांगे अन् पंकजा मुंडे एकाच व्यासपीठावर; कार्यकर्त्यांनी घातला गोंधळ; नेमकं काय घडलं?

IPL 2024, GT vs RCB Live Score: पुनरागमन करताच मॅक्सवेलचा गुजरातला मोठा दणका! कर्णधार शुभमन गिलला धाडलं माघारी

Nashik News : 10 वर्षानंतर धुळ झटकली; म्हाडा प्रकरणातील प्रस्ताव तपासण्याच्या सूचना

Latest Marathi News Live Update : एमके स्टॅलिन यांच्या पत्नीकडून तिरुपती येथील श्री व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात प्रार्थना

Ulhasnagar Crime : मटका किंगच्या मुलावर जीवघेणा हल्ला करणारा आरोपी जेरबंद ; इन्स्टाग्राम पोस्टमुळे अडकला जाळ्यात

SCROLL FOR NEXT