Loni_Kalbhor_Police 
पुणे

कोणी निंदा कोणी वंदा, आमचा परमार्थाचा धंदा; पोलिसांनी स्वखर्चाने केले बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार

सकाळ वृत्तसेवा

लोणी काळभोर (पुणे) : कोरोनाच्या काळात जन्मदात्या आई-वडिलांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करायला मुलगा अथवा जवळचे नातेवाईक अथवा गावकरी पुढे आले नाही. मात्र, लोणी काळभोर पोलिसांनी महिनाभराच्या काळात कोणताही गाजावाजा न करता तीन अनोळखी मृतदेहांवर स्वखर्चाने अंत्यसंस्कार केले असल्याची बाब पुढे आली आहे. 

सॉफ्ट टार्गेट म्हणून पोलिस पैसे खातात, पोलिस वेळेवर येत नाहीत, पोलिस सर्वसामान्याची कामे करत नाहीत अशा विविध टीका करणाऱ्यांना, लोणी काळभोर पोलिसांनी आपल्या कृतीमधून जोरदार थप्पड लगावली आहे. लोणी काळभोर पोलिसांच्या वरील कृत्यामुळे पोलिस खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह लोणी काळभोर आणि परिसरातील नागरीकांकडून पोलिसांवर अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे. 

लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीतील आठवडे बाजाराच्या आवारात बुधवारी (ता.२३) एका साठ वर्षीय अनोळखी व्यक्तीचा मृतदेह पडला असल्याचे स्थानिक नागरिकांच्या लक्षात आले. नागरिकांनी ही बाब लोणी काळभोरचे पोलीस निरीक्षक सूरज बंडगर यांना कळवली. यावर बंडगर यानी तात्काळ पोलिस कर्मचारी संदीप देवकर आणि महेंद्र लोहार यांनी घटनास्थळी पाठवून दिले आणि पंचनामा करण्याच्या सूचनाही केल्या. पोलिसांनी पंचनामा केल्यानंतर, लोणी काळभोर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. डी. जे. जाधव यांनी सदर मृतदेहाची पाहणी करून, सदर व्यक्तीचा अकस्मात मृत्यू झाल्याचा अहवाल पोलिसांना दिला. 

दरम्यान पोलिसांचे कायदेशीर सोपस्कार पूर्ण झाल्यावर या व्यक्तीचा मृतदेह स्मशानभूमीत नेण्यात आला. त्या ठिकाणी लोणी काळभोर पोलिसांच्या वतीने संदीप देवकर, महेंद्र लोहार, लोणी काळभोरचे पोलीस पाटील लक्ष्मण काळभोर, ग्रामविकास अधिकारी डी. के. पवार, ग्रामपंचायतीच्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते राम भंडारी, महेश भंडारी यांनी बेवारस मृतदेहावर अंत्यसंस्कार केले.

लॉकडाऊनच्या कालावधीत लोणी काळभोर आणि कदमवाकवस्ती या दोन ग्रामपंचायतीच्या परिसरात सापडलेला हा तिसरा बेवारस मृतदेह आहे. यापूर्वी कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीत आढळून आलेल्या आणखी दोन मृतदेहांवर लोणी काळभोर ग्रामपंचायतींच्या सहकार्याने लोणी काळभोर पोलिसांनी अंत्यसंस्कार केले आहेत. याबद्दल पोलिस खाते कौतुकास पात्र आहे.

बेवारस व्यक्तीवर अंत्यसंस्कार करण्याबाबत ठोस उपाययोजनांची गरज 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोणी काळभोर, उरुळी कांचनसह जिल्ह्यामधील अनेक ग्रामपंचायत हद्दीत मागील काही दिवसांपासून बेवारस मृतदेह आढळून येऊ लागले आहेत. यामुळे बेवारस मृतदेहावर कोण आणि कुठे अंत्यसंस्कार करणार हा नवीनच प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे. लोणी काळभोर पोलिसांनी आपल्या पद्धतीने हा प्रश्न तात्पुरत्या स्वरूपात सोडवला असला तरी, यापुढील काळात कोरोनाचा धुमाकूळ वाढत राहणार आहे, तसेच बेवारस मृतदेहांचा प्रश्न आगामी काळात अत्यंत गंभीर होणार आहे. शासन, स्वयंसेवी संस्था किंवा संबंधित प्रशासकीय यंत्रणेला या प्रश्नाची अद्याप जाणीवच झालेली नाही. परंतु या सर्वांनी या संदर्भात लवकरच काही ठोस भूमिका किंवा निर्णय घ्यावा लागणार आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Voter Fraud: बापरे! एकाच घरात ४ हजार २७१ मतदार; अधिकाऱ्यांनी केले हात वर, म्हणाले...

Latest Maharashtra News Updates : मुंबईकरांचे म्हाडाच्या लॉटरीतील घराचे स्वप्न लांबणीवर!

Gold Investment : 'पितृपक्षात सोने खरेदी करू नये' हा गैरसमज मोडीत; सराफ व्यावसायिकांचे निरीक्षण

US tariff on India update: अमेरिका लवकरच मोठा निर्णय घेणार! भारतावरील अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ हटवणार?

Neeraj Chopra कडून घोर निराशा! जागतिक स्पर्धेत सुवर्णपदक राखण्यात अपयशी, टॉप-६ मध्येही स्थान नाही

SCROLL FOR NEXT