MCED 
पुणे

उद्योजकतेकडे करिअर म्हणून पाहा

सकाळवृत्तसेवा

पुणे - ‘उद्योजकतेचे क्षेत्र विस्तारले असून, नव्या पिढीने त्याचा लाभ घेतला पाहिजे. तरुणांनी या क्षेत्रावर करिअरच्या दृष्टीने लक्ष केंद्रित केले पाहिजे. यातून या क्षेत्राचा आणखीन विकास होईल,’ असे प्रतिपादन महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (एमसीईडी) मुंबईचे वरिष्ठ उद्योग अधिकारी सुरेश लोंढे यांनी केले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन सोसायटी आणि एमसीईडी पुणे यांच्या वतीने नुकतेच ‘उद्योजकता विकास मार्गदर्शन’ कार्यक्रमाचे आयोजन केले होते, त्या वेळी ते बोलत होते. इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी डिप्लोमाचे प्राचार्य डॉ. व्ही. एन. जगताप, दीपक भिंगारदेव, सुनील शेटे, एस. एम. कुंभार आदी उपस्थित होते. या कार्यक्रमात १०० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. विद्यार्थ्यांना उद्योजकता विकासाच्या विविध संधी उपलब्ध करून देणे आणि त्यांना उद्योगांसाठी मदत करणे हा या उपक्रमाचा उद्देश होता.

लोंढे म्हणाले, ‘आताच्या विद्यार्थ्यांसमोर उद्योजकतेचे अनेक पर्याय आहेत. करियरसाठी या क्षेत्रात विविध संधी खुल्या असून त्यासाठी उद्योजकीय मानसिकता तयार करणे आवश्‍यक आहे. तरुणांनी छोट्या उद्योगांपासून सुरुवात करून नव संकल्पना घेऊन व्यवसायात उतरावे. सतत नवनवीन गोष्टी शिकणे, लोकांना समजून घेणे आणि प्रभावित करणे व्यवसायात महत्त्वाचे असते. यासाठी महाराष्ट्र उद्योजकता केंद्र सर्व शासकीय योजना आणि मार्गदर्शन घेऊन विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभे राहील.’

विद्यार्थ्यांना केंद्रित करून एमसीइडीने पुरविलेल्या सर्व सुविधांचा लाभ घेत दरवर्षी ५० उद्योजक आझम कॅम्पसमधून उभे राहतील, असा विश्वास डॉ. जगताप यांनी या वेळी व्यक्त केला. 

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अ‍ॅडव्हान्स कर भरलात का? आज शेवटची तारीख, न भरल्यास होईल दंड

Sanjay Raut : भारत-पाक सामन्यामुळे पाकिस्तानला मिळाले हजार कोटी रुपये? संजय राऊत म्हणतात दीड लाख कोटींचा जुगार...

Gold Rate Today : आज अचानक उतरले सोन्याचे दर! किती हजारांनी स्वस्त झालं, पाहा एका क्लिकवर

Nashik News : नाशिक रोड परिसरात धक्कादायक घटना: मुंबई-हावडा एक्सप्रेसखाली उडी घेऊन प्रेमीयुगुलाने जीवन संपवले

India vs Pakistan Asia Cup : 'ऑपरेशन सिंदूर'वरून भारताला डिवचणाऱ्या पाकिस्तानच्या खेळाडूंनी किती धावा केल्या? पाहा स्कोअर कार्ड..

SCROLL FOR NEXT