पुणे

पुणे : 50 कोटी कर्ज मिळवण्याच्या नादात सराफाने गमावले 1 कोटी 60 लाख 50 हजार रुपये

सकाळवृत्तसेवा

पुणे :  चंडीगडमध्ये व्यवसाय सुरू करून देण्यासाठी 50 कोटी रुपयांचे कर्ज मिळवून देण्याच्या आमिषाने प्रसिद्ध सराफ व्यावसायिक पु. ना. गाडगीळ यांना एक कोटी 60 लाख 50 हजार रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे. या प्रकरणी सौरभ विद्याधर गाडगीळ (वय 43) यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

गाडगीळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रोहितकुमार शर्मा (वय 59) विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. हा प्रकार ऑक्‍टोबर 2018 ते फेब्रुवारी 2019 या कालावधीत घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पु. ना. गाडगीळ ज्वेलर्सची शाखा चंडीगड येथे उघडण्यासाठी 50 कोटीचे कर्ज मिळवून देतो, असे आमिष दाखवत रोहितकुमार शर्मा याने गाडगीळ यांच्या पुण्यातील कार्यालयात येऊन त्यांच्याशी संपर्क साधला. त्यांचा विश्वास संपादन करून कर्ज वितरणासाठी आणि प्रक्रिया शुल्क म्हणून फिर्यादींकडून 1 कोटी 60 लाख 50 हजार रुपये घेतले. 

पुणे जिल्ह्यातील मतदान केंद्रावर 'राडा'; दोन्ही गटातील कार्यकर्ते भिडले​

दरम्यान पैसे देऊन अनेक दिवस उलटून गेल्यानंतरही कर्जाची प्रक्रिया किंवा पैसे मिळत नसल्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे फिर्यादी यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी फिर्याद दिली आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक कुलकर्णी करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Drought: दुष्काळग्रस्त तालुक्यांची संख्या वाढणार, लोकप्रतिनिधींकडून आणखी तालुक्यांचा समावेशाच्या मागणीची शक्यता

Vaijapur Student Assault Case: गणिताचे कोडे न सुटल्याने चौथीच्या विद्यार्थ्याला बेदम मारहाण

Shiv Sena Leader Death : शिंदेसेनेच्या बड्या नेत्याने उचललं टोकाचं पाऊल, शेती पिकत नसल्याने घेतला निर्णय

Latest Marathi News Live Update : मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदावर्तेंचा थेट इशारा

ST Bus: एसटी प्रवासात NCMC कार्ड अनिवार्य; फक्त ३ दिवस बाकी, आताच करा 'हे' काम, अन्यथा सवलत रद्द

SCROLL FOR NEXT