Crime Sakal
पुणे

इंग्लंडमध्ये नोकरीचे आमिष उच्चशिक्षित तरुणाला पडले तब्बल पावणे पाच लाखांना

इंग्लंडमध्ये चांगल्या पगाराची नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून अनोळखी व्यक्तीने एका उच्चशिक्षित तरुणाला पावणे पाच लाख रुपयांना गंडा घातला.

प्रशांत पाटील

पुणे - इंग्लंडमध्ये (England) चांगल्या पगाराची नोकरी (Job) मिळवून देण्याचे आमिष (Lure) दाखवून अनोळखी व्यक्तीने एका उच्चशिक्षित तरुणाला (Youth) पावणे पाच लाख रुपयांना गंडा (Cheating) घातला. अनोळखी व्यक्तीविरुद्ध सिंहगड रोड पोलिस ठाण्यात गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला आहे. (Lure Job in England Fell Highly Educated Young Man Tune of Five Lakhs)

याप्रकरणी उज्वल काकडे (वय 30, रा. माणिकबाग, सिंहगड रोड) यांनी सिंहगड रोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी उज्ज्वल यांनी इंग्लंडमधून एमएससीचे शिक्षण पुर्ण केले आहे. त्यानंतर ते वर्षभरापुर्वी भारतात परतले. तेव्हापासून ते नोकरीच्या शोधात होते. नोकरीसाठी त्यांनी एका संकेतस्थळावर त्यांची वैयक्तीक माहिती भरून दिली होती. दरम्यान, 24 फेब्रुवारीला त्यांना एक ईमेल आला. त्यानुसार, इग्लंडमधील एका नामांकित कंपनीत स्टोअर किपर मॅनेजरची नोकरी उपलब्ध असल्याचे सांगून त्यांना चांगला पगार देण्याबाबत ईमेलमध्ये नमूद केले होते. त्यानंतर फिर्यादीने संबंधीत ईमेलला प्रतिसाद देताना वैयक्तीक माहिती पाठविली. त्यानंतर त्यांना नोकरीसाठी व्हिसाची प्रक्रिया करावी लागेल, असे सांगून त्यांच्याकडे काही रक्कम मागण्यात आली.

तसेच पैसे पाठविण्यासाठी एका बॅंक खात्याचा क्रमांकही फिर्यादीस पाठविण्यात आला. फिर्यादीने त्यांच्यावर विश्‍वास ठेवून ठराविक रक्कम पाठविली. त्यानंतर संबंधीत व्यक्तीनी सातत्याने वेगवेगळी कारणे सांगून फिर्यादीकडून चार लाख 67 हजार रुपये काढून घेतले. त्यानंतरही त्यांच्याकडून नोकरीसाठी कुठलेच प्रयत्न होत नव्हते, तसेच पैशांची मागणीही वाढत चालली होती. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी सायबर पोलिसांकडे तक्रार अर्ज दाखल केला. या अर्जाची चौकशी झाल्यानंतर सिंहगड रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक (गुन्हे) प्रमोद वाघमारे करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

फक्त दीड लाख लोकसंख्या असलेला देश फीफा वर्ल्डकपसाठी पात्र; प्रशिक्षकाच्या अनुपस्थितीत घडवला इतिहास

PMPML Buses : पुणेकरांसाठी मोठी बातमी! पीएमपीच्या ताफ्यात ४ महिन्यात येणार २००० नवीन बस; प्रवासीसंख्या २० लाखांवर नेण्याचे लक्ष्य

DSP Chitra Kumari : कोचिंग न घेता 20 व्या वर्षी बनली DSP; वडिलांनी लेकीच्या शिक्षणासाठी विकली जमीन, देशभर चर्चेत असलेली सुपर गर्ल कोण?

Malegaon News : मालेगाव जन्मदाखला घोटाळा: १ हजार २७३ दाखले रद्द, ५०० नागरिक गायब; २४ जणांनी परदेशात पलायन केल्याचा किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप

Latest Marathi Breaking News Live Update : पुण्यात कोयता गँगचा धुमाकूळ, रेस्टॉरंट आणि बारमध्ये घुसून राडा

SCROLL FOR NEXT