Sim card Sakal
पुणे

बनावट आधारकार्ड बनवून एकच सिमकार्ड तीन जणांना विकले

कोरेगाव पार्क येथील अतिश्रीमंत व्यक्तीचे वीस वर्षांपासून वापरात असलेले स्पेशल सीमकार्ड अचानक बंद झाले.

दिलीप कुऱ्हाडे

पुणे - कोरेगाव पार्क येथील अतिश्रीमंत व्यक्तीचे वीस वर्षांपासून वापरात असलेले स्पेशल सीमकार्ड (Special Simcard) अचानक बंद झाले. त्यांचे सीमकार्ड नाशिक, सुरत आणि भूतानमध्ये वेगवेगळ्या कंपनीच्या नावाने सुरू असल्याचे कळताच त्यांना धक्का बसला. त्यांनी संबंधित मोबाईल कंपनीत (Mobile Company) चौकशी केली असता, त्यांना उडवा- उडवीचे उत्तर मिळाली. त्यानंतर त्यांनी पोलिस ठाणे, दूरसंचार मंत्रालय, भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाकडे (ट्राय) पाठपुरावा केल्यानंतर त्यांचे सीमकार्ड सुरू झाले. मात्र आरोपी अद्याप मोकाट आहेत. (Made a Fake Aadhaar Card and Sold a Single SIM Card to Three People)

राहुल भारद्वाज (नाव बदलले आहे) यांनी वीस वर्षांपूर्वी पन्नास हजार रुपये देऊन एका मोबाईल कंपनीचे स्पेशल सीमकार्ड विकत घेतले होते. त्या सीमकार्डची आता दीड लाख रुपये किंमत आहे. ते सीमकार्ड पंधरा दिवसांपूर्वी अचानक बंद झाले. त्यामुळे त्यांनी संबंधित मोबाईल कंपनीत चौकशी केली. तेव्हा त्यांचे सीमकार्ड नाशिक येथील ग्राहकाने पोर्ट केल्याचे कळले. त्यांनी अधिक चौकशी केली, तेव्हा त्यांचे सीमकार्ड तीन मोबाईल कंपन्यांमध्ये पोर्ट केले असून नाशिक, सुरत आणि भुतान याठिकाणी ते सुरू असल्याचे कळताच त्यांना धक्का बसला.

भारद्वाज यांनी तत्काळ कोरेगाव पार्क पोलिस ठाणे गाठले. पोलिसांनी तातडीने संबंधित मोबाईल कंपन्यांमध्ये भारद्वाज यांना पाठवून तक्रार अर्ज दाखल करण्यास सांगितले. कंपनीने गोपनीयतेचे कारण देऊन, त्यांना माहिती देण्यास टाळाटाळ केली. त्यानंतर ते भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाकडे (ट्राय) गेले. तेथेसुद्धा त्यांची निराशा झाली. त्यानंतर त्यांनी केंद्रीय दूरसंचार मंत्रालयात पत्रव्यवहार केला.

मंत्रालयाने घटनेचे गांभीर्य ओळखून, ‘ट्राय’ला संबंधित मोबाईल कंपन्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यास सांगितले. ‘ट्राय’ने दखल घेताच मोबाईल कंपन्यांनी सारवा सारव करून त्यांच्याकडे पोर्ट झालेले तीनही सीमकार्ड तातडीने बंद केले.

मोबाईल कंपनीच्या हलगर्जीपणामुळे १ सिमकार्ड तीन ठिकाणी पोर्ट झाले होते. संबंधित व्यक्तीने तक्रार दिल्यानंतर त्याची चौकशी सुरू केली आहे. बनावट आधारकार्डच्या माध्यमातून दुसऱ्याचे सिमकार्ड पोर्ट करून विकणाऱ्यांना पकडले जाईल.

- दिलीप शिंदे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, कोरेगाव पार्क पोलिस ठाणे

पोर्ट केलेल्या सिमकार्डवर बँकेच्या व्यवहाराचे मेसेज जात होते. अज्ञातांकडून गुन्हे घडल्यास त्याला जबाबदार कोण, यासाठी पाठपुरावा करून सिमकार्ड परत मिळवले.

- राहुल भारद्वाज, मोबाईल ग्राहक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अग्रलेख : पहिल्या घासाला खडा

Horoscope Prediction : आज धनयोग + सर्वार्थ सिद्धी योग! 'या' 5 राशींना होणार धनलाभ अन् भगवान विष्णू अनेक अडचणी दूर करणार!

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 20 नोव्हेंबर 2025

ढिंग टांग : बिबटे : ठिपके आणि ठपके..!

Horoscope : शुक्र ग्रहात विशेष गोचर! बनतोय लक्ष्मी नारायण योग; 'या' राशीच्या लोकांच्या अपूर्ण इच्छा होणार पूर्ण, पैशाची अडचण संपणार

SCROLL FOR NEXT