पुणे

पुरंदर तालुक्याचे लक्ष लागलेल्या माळशिरसचा कारभारी ठरला !

दत्ता जाधव

माळशिरस : येथील सरपंच महादेव बोरावके यांच्यावरती विरोधी माजी सरपंच अरुण यादव यांच्या गटाने आणलेला अविश्वास प्रस्ताव तीनशेहून अधिक मतांनी फेटाळत माळशिरस ग्रामस्थांनी दोन वर्षापूर्वी विद्यमान सरपंच महादेव बोरावके यांच्यावरती दाखवलेला विश्वास कायम ठेवला. यामुळे ग्रामपंचायतीत सत्ता असणाऱ्या अरुण यादव यांच्या गटाला मोठा धक्का बसला. 

सुरुवातीला सरपंच अविश्वास प्रस्तावाची विशेष ग्रामसभा अत्यंत चुरशीची वाटत असताना विद्यमान सरपंच महादेव बोरावके यांनी मात्र एकतर्फीच जिंकली. अविश्वास प्रस्तावासाठी आज ग्रामस्थांनी अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद देत सतराशे तेवीस मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावत ग्रामसभेचे महत्त्व अधोरेखित केले.

यामध्ये अविश्वास प्रस्तावाच्या बाजूने 587 मते मिळाली तर विद्यमान सरपंच महादेव बोरावके यांच्या बाजूनी 882 मतदारांनी कौल दिला. 254 मतदान बाद झाले. ग्रामसभेच्या या निकालाने अरुण यादव यांच्या गटाला मोठा धक्का बसला असून, ग्रामपंचायतीमध्ये त्यांचे दहा सदस्य असतानाही ग्रामस्थांनी आज दिलेल्या निकालावरून त्यांना नाकारल्याचे स्पष्ट झाले. 

दोन वर्षांपूर्वी सर्वसामान्य मतदारांनी महादेव बोरावके यांच्या बाजूने कौल देऊनही अरुण यादव यांच्या गटाने आणलेला अविश्वास प्रस्ताव सर्वसामान्य जनतेला रुचला नसल्याचे आजच्या विशेष ग्रामसभेच्या निकालानंतर स्पष्ट झाले आहे.

यामुळेच पंचवार्षिक निवडणुकीत काठावरती सरपंच झालेल्या महादेव बोरावके यांच्या झोळीत मतदारांनी भरभरून मतदान देत तीनशेहून अधिक मताधिक्याने यांना विजयी केले. निकालानंतर सरपंच महादेव बोरावके यांनी  हा सर्वसामान्य जनतेचा व लोकशाही प्रणालीचा विजय असल्याचे सांगून पुढिल काळात गावकऱ्यांचा हा विश्वास प्रयत्नांची पराकाष्टा करून सार्थ करू असा विश्वास व्यक्त केला.

(संपादन : सागर डी. शेलार)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amravati News : दहा दिवसांच्या बाळावर अघोरी उपचार; गरम विळ्याने दिले ३९ चटके अन्... मेळघाटातील धक्कादायक प्रकार

Tulsi Remedies Ekadashi: आषाढी एकादशीला करा तुळशीचे 'हे' उपाय सर्व मनोकामना होतील पूर्ण

Ashadhi Wari: विदर्भातून १५९४ मध्ये निघाली पहिली पालखी; १९३८ दिंड्या पंढरपुरात,रुक्मिणी संस्थान नंतर चंदाजी महाराज दिंडीचा समावेश

Elon Musk New Party: इलॉन मस्क स्थापन करणार अमेरिकेतील तिसरा सर्वात मोठा पक्ष, डोनाल्ड ट्रम्प यांचा फायदा होणार की नुकसान?

Ashadhi Ekadashi: देहेडच्या पुरातन वटवृक्षावर ‘कान्होपात्राची महावेल’;भोकरदन तालुक्यातील विठ्ठल भक्त दर्शनासाठी करतात गर्दी

SCROLL FOR NEXT