mahadev jankar sakal
पुणे

Mahadev Jankar : राष्ट्रीय समाज पक्ष सत्ता मिळवण्यासाठी राज्यात स्वबळावर लोकसभा निवडणूक लढवणार - महादेव जानकर

राष्ट्रीय समाज पक्ष सत्तेत आल्यानंतर मराठा, मुस्लीम व धनगर समाजाला आरक्षणाचा प्रश्न दोन दिवसात मार्गी लावणार

डी के वळसे पाटील

मंचर - “राष्ट्रीय समाज पक्षाची सत्ता येण्यासाठी महाराष्ट्रातील ४८ लोकसभा मतदार संघात स्वबळावर निवडणूक लढवणार आहे. त्यामध्ये शिरूर व बारामती लोकसभा मतदार संघाचा समावेश आहे. सत्तेत आल्यानंतर मराठा, मुस्लीम व धनगर या समाजाला आरक्षणाचा प्रश्न दोन दिवसात मार्गी लावला जाईल.’ अशी ग्वाही राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी दिली.

राष्ट्रीय समाज पक्षाने जानकर यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या रथ यात्रेचे शनिवारी (ता.१६) मंचर येथे सर्व जाती धर्माच्या कार्यकर्त्यांनी जोरदार स्वागत केले. यावेळी पत्रकारांशी बोलताना जानकर यांनी भारतीय जनता पक्ष व कॉंग्रेस पक्षावर टीका केली. ते म्हणाले “भारतीय जनता पक्ष व काँग्रेस पक्ष कधीही आरक्षण देणार नाही.

ते फक्त झुलत ठेवण्याचे काम गेली अनेक वर्ष करत आहेत. आम्ही भाजप बरोबर होतो. पण सध्या त्यांना लहान पक्षांची गरज वाटत नसल्याने देशातील विविध राज्यात रथ यात्रेच्या माध्यमातून पक्ष बळकटीकरण करण्याचे काम आम्ही सुरू केले आहे.

गावोगावी जनस्वराज्य यात्रेला उत्स्पुर्त प्रतिसाद मिळत आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजप व इंडियाकडून निमंत्रण आल्यास विचार करू अन्यथा आमचा स्वबळाचा मार्ग मोकळा आहे. पक्ष संघाटना बांधणीचे काम मजबूत असून सर्व धर्मियांना या पक्षामध्ये प्राधान्याने स्थान दिले जाते.

त्यामुळे आम्हाला विचारल्याशिवाय राज्यात व देशात सत्ता स्थापन होऊ शकणार नाही. असे संख्याबळ आमच्याकड असेल याचे भान प्रस्थापित पक्षातील नेत्यांनी ठेवावे.”

यावेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय महासचिव सुशील कुमार, ज्ञानेश्वर सलगर, युवक अध्यक्ष अजित पाटील, समन्वयक सचिन गुरव, अॅड संजय माने, विनायक रुपनवर, सचिन लोंढे, भाऊसाहेब घोडे, योगेश धरम उपस्थित होते.

मंचर (ता.आंबेगाव): राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांच्या स्वागत प्रसंगी घोषणा देताना कार्यकर्ते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shaha : शिवरायांनी स्वराज्याचे संस्कार रुजविले... पेशव्यांनी स्वराज्य पुढे नेले; अमित शाहांचे पुण्यात गौरवोद्गार

Latest Maharashtra News Updates : हांडेवाडीमध्ये टायर साठ्याच्या शेडला भीषण आग

'ज्याने हे केलय त्याच्यावर आता...' मुलाबद्दल फेक न्यूज पसरवणाऱ्यावर रेशम टिपणीस भडकली, म्हणाली, 'तो ठणठणीत आहे.'

शरद उपाध्ये स्वतःची चूक स्वीकारायला तयारच नाहीत; उलट नेटकऱ्यांनाच दिलं ज्ञान, मग नेटकरीही भडकले, म्हणाले-

Sangli Girl : धक्कादायक! अल्पवयीन मुलीवर दमदाटीने दोघांचे शारिरीक संबंध, आणखी दोघांनी त्याच मुलीवर केला विनयभंग; पोलिस म्हणतात...

SCROLL FOR NEXT