पुणे

तिरकस अज्ञातसिद्ध

CD

तिरकस : अज्ञातसिद्ध
........
बोले तैसा चाले
.......
महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ कर्मवीर ठाणेकर यांची आज जिल्ह्यात ठिकठिकाणी सभा झाली. या सभेतील भाषणाचा सारांश म्हणजे आदरणीय ठाणेकर हे दिलेला शब्द पाळणारे नेते आहेत असाच होता. लाडक्या बहिणींसाठी ओवाळणी २१०० करण्याचा विषय सोडून इतर सर्व विषयावर ते बोलून गेले. त्याबद्दल एका लाडक्या बहिणीची आपल्या लाडक्या भावाकडे लाडिक तक्रार.
..........
आदरणीय कर्मवीर ठाणेकर तथा लाडके भाऊ...
महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणीच्या वतीने लाख लाख शुभाशीर्वाद...
दादा आपले पाय आमच्या गावाला लागले म्हणजे हा दिवस आमच्यासाठी जणू दिवाळी दसरा.... फक्त साधुसंताच्या जागी लाडका भाऊ... जसे
''तोची साधू ओळखावा ऐवजी तोची भाऊ ओळखावा'' एवढाच काय तो फरक. अन्यथा दादा तुमच्यासारखा भाऊ होणे नाही. तुम्हा तिघा भावांमुळे आम्हा बहिणीची ओवाळणी न चुकता आमच्या खात्यात जमा होतेय. दुर्दैवानं एक भाऊ काळाने ओढून नेला. मात्र, काही असो यास तिघा भावांमध्ये दादा तुम्ही सगळ्यात लाडके. कारण लाडकी बहीण योजना सुरू करण्याची कल्पना तुमचीच... तुमच्यासारखा मोठ्या मनाचा भाऊ मुख्यमंत्री झाला आणि ही योजना सुरू झाली.
दादा तुम्ही काल वैरागला येणार म्हणून आम्ही दारी सडा-रांगोळ्या केल्या. घराला तोरणे - पताका लावल्या. तुमचा ताफा पाहण्यासाठी आम्ही रस्त्याच्या दुतर्फा उभा होतो.
तुम्ही आलात.. जनतेच्या विकासासाठी पटापट पैसे देऊन मोकळे झालात.. किती तुमचे मोठे मन. मुंबईला पोचताच निधीचे पत्र व्हाट्सअपवर पाठवण्याचे आश्वासन पण दिले. ''जे तुम्ही बोलता ते तुम्ही करताच. जे तुम्ही करत नाही ते तुम्ही बोलतच नाही'', असा विश्वास तुम्ही आम्हाला दिला. तेथील ''संत्र्या''चा की ''साखरे''चा कारखाना सुरू करण्याचे आश्वासन दिले. एमआयडीसी तर अगदी एखाद्या तंबाखू खाणाऱ्याने दुसऱ्या तंबाखू खाणाऱ्यास चुन्याची डबी द्यावी, इतक्या सहजपणे तुम्ही देऊन टाकली. ''बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले'' या संताच्या उक्तीप्रमाणे तुम्ही आहात, याचाच प्रत्यय तुमच्या भाषणातून तुम्ही आणून दिला.
लाडक्या बहिणीची आठवण तुम्ही काढली. मात्र, दादा लाडक्या बहिणीची ओवाळणी १५०० वरून २१०० करण्याबद्दल मात्र काहीही बोलला नाहीत. विसरलात वाटत... असू द्या. विसरू नका. फक्त लक्षात ठेवा म्हणजे झालं... इथे आता आमची लाडकी वहिनी पण कारभारात आहे हे लक्षात ठेवा. आम्ही महिला प्रपंच कसा भागवतो हे आजच्या वाहिनीला चांगले माहिती आहे.

कळावे तुमचीच,
एक लाडकी बहीण
......

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate: आनंदाची बातमी! सोने आणि चांदीच्या किंमती कमी आणखी कमी होणार; केंद्र सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय, पण कोणता?

Viral : महिलेवर अत्याचार केल्याचा खोटा आरोप, 20 वर्षांपासून तुरुंगात, 43 व्या वर्षी निर्दोष सुटका; बाहेर येताच त्याने...पाहा VIDEO

पुणेकरांनो लक्ष द्या! दिवे घाटातील वाहतूक राहणार बंद, पर्यायी मार्गांचा वापर करण्याचं आवाहन, पण कधी?

विमानात अचानक तरुणाचा धिंगाणा! कपडे काढून घातला गोंधळ, अखेर करावी लागली इमरजन्सी लँडिंग, पाहा Viral Video

Turkish Airlines Emergency Landing : २३६ प्रवाशांना घेऊन उड्डाण केलेल्या विमानाच्या इंजिनला अवघ्या काही मिनिटांतच लागली आग!

SCROLL FOR NEXT