Sharad Pawar_Bhagat Singh Koshyari 
पुणे

"महाराष्ट्राला कर्तृत्ववान राज्यपालांचा वारसा, कोश्यारींवर न बोललेलं बरं"

गेल्या काही दिवसांपासून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे आपल्या वादग्रस्त विधानांमुळं चर्चेत आहेत.

सकाळ डिजिटल टीम

पुणे : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे गेल्या काही दिवसांपासून वादग्रस्त विधानांमुळं चर्चेत आहेत. त्यांच्या या विधानांवर राज्यातील ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी भाष्य केलं आहे. महाराष्ट्राला अनेक कर्तृत्ववान राज्यापालांचा वारसा आहे. त्यात आजच्या राज्यपालांबाबत भाष्य न केलेलंच बरं, अशा शब्दात पवार यांनी राज्यपालांवर टीका केली आहे. पुण्यात पत्रकार परिषदेत ते बोलत होते. (Maharashtra has legacy of capable governor better not to talk about Koshyari says Sharad Pawar)

शरद पवार म्हणाले, हे राज्यपाल आल्यानंतर अनेक प्रकार घडले. महाराष्ट्रात यापूर्वी सी प्रकाश हे राज्यपाल होते. त्यावेळी मी कार्यकर्ता म्हणून काम करत होतो. त्यावेळी यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री होते. राज्याचे राज्यपाल सी प्रकाश यांचं त्यावेळी देशात आणि देशाबाहेर नावलौकिक होता. त्यांना मी राज्यपाल म्हणून पाहिलं आहे. त्याचबरोबर या राज्यात पी. सी. अलेक्झांडर यांच्यासारखा कर्तृत्ववान राज्यपाल मी स्वतः पाहिला आहे. अशा राज्यपालांमध्ये हल्लीच्या राज्यपालांचं नाव ऐकायला मिळतं यावर भाष्य न केलेलं बर. केंद्र सरकारच्या कामाची पातळी घसरतेय ते कुठपर्यंत घसरत गेलेत याची अनेक उदाहरण आहेत. त्याची ही कामगिरी महाराष्ट्रातही पहायला मिळत आहे"

"विधानसभा आणि विधानपरिषदेचे सभासद नेमण्याचा अधिकार राज्यपालांना आहे. वर्ष होऊन गेलं तरी या सदस्यांच्या नियुक्त्या होत नाहीत. याचा अर्थ काय की, राज्यपालपदाची प्रतिष्ठा महाराष्ट्रात अनेकांनी सांभाळली ती प्रतिष्ठा आम्ही ठेवणारच नाही, असा निर्धार करुन कोणी काम करत असेल तर त्यावर भाष्य न केलेलं बरं. राष्ट्रपती आणि पतंप्रधान यांनी याचा विचार करावा", असा शब्दांत शरद पवार यांनी राज्यपालांच्या कार्यपद्धतीवरही सडकून टीका केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ARG vs Austria : लिओनेल मेस्सीचा विश्वविक्रमी गोल पाहिलात का? ज्याने अर्जेंटिनाला Fifa World Cup च्या पुढील फेरीत पोहोचवले Video Viral

Lionel Messi ने इतिहास रचला! वर्ल्ड कपमध्ये असा पराक्रम करणारा जगातील पहिला खेळाडू ठरला; पेनल्टी हुकली, पण विक्रमाची संधी साधली...

Argentina vs Austria : ५६ वर्षानंतर चमत्कार झाला... लिओनेल मेस्सीचा World Cup मध्ये दरारा, ९६ वर्षांच्या स्पर्धा इतिहासात तिघांनाच हा पराक्रम जमलाय...

England Squad vs India T20I: भारताविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेसाठी इंग्लंडचा संघ जाहीर; वैभव सूर्यवंशीला रोखण्यासाठी २२ वर्षीय ऑलराऊंडरला संधी

LPG Shortage: पुन्हा गॅस संकट! कतारमधील गॅस प्लांटमध्ये भीषण स्फोट; १३ जणांचा मृत्यू, मृतांमध्ये भारतीयांचा समावेश

SCROLL FOR NEXT