Maharashtra kesari is became difficult after corona
Maharashtra kesari is became difficult after corona 
पुणे

मास्क वापरुन कुस्ती शक्‍यच नाही! कोरोनानंतर महाराष्ट्र केसरी अवघड

सागर आव्हाड

पुणे : कमालीचा संपर्क असलेल्या कुस्तीचे पुनरागमन अवघड आहे. मास्क लावल्याने कुस्ती खेळता येत नाही. स्पर्धक लढतीपूर्वा आपले हात पूर्ण स्वच्छ करुन येऊ शकतील पण मास्क घालुन कुस्ती अशक्‍यच आहे, असे मत कुस्तीगीरांनी "सकाळ'शी बोलताना व्यक्त केले आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

''महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा दरवर्षी होत असतात. त्याचा सराव ऑक्‍टोबर महिन्यात सुरू होतो. मात्र यावर्षी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा कोरोनामुळे होईल की नाही हे सांगतात येत नसल्यामुळे पैलवान ही चिंतेत आहेत. कोरोनाच्यामुळे कुस्तीची मैदान यावर्षी झाली नाही. त्यामुळे अनेक पैलवान तालमी सोडून गावकडे निघून गेली, कारण तालमीत लागण्यासाठी खुराकला पैसे नाहीत. आणि यात्रामधील मैदानावर पैसे मिळत होते ते ही मिळाले नाहीत, ्अशी माहिती वस्ताद पंकज हरपुडे यांनी दिली.

महाराष्ट्र उपकेसरी अक्षय शिंदे म्हणतात,""कुस्तीत झटापट होताना चेहऱ्यावरही हात लागतो. तसाच तो मानेवरही जातो. या झटापटीत मास्क निघु शकतो. अनेकदा कुस्तीगीर कानाला पकडतात हा कानावर घातलेला मास्क निघेलही.त्याच बरोबर कुस्तीगीरांना लढतीच्या वेळी तोंडानेही श्वास घेतात त्यातही त्यांना अडथळा येणार. माती वरील कुस्ती तर मास्क संपुर्ण मातीने खराब होईल कुस्ती खेळात मास्क लावून खेळणे अवघड आहे. खुराकला पैसे नाहीत कारण यावर्षी यात्रा बंद होत्या त्यामुळे सरकारने यावर मार्ग काढावा अस कुस्तीगीर सांगतात. ज्या प्रमाणे आयपीएल सामने सुरू आहेत, त्याप्रमाणे कुस्ती बिना प्रेक्षकांनची स्पर्धा किंवा लीग घेता येईल. सध्या तालमीत पैलवान कमी आहेत सराव करताना अनेक अडचणी येतात सरकारने यावर उपाय काढावा असे वस्ताद सांगतात. 

मुंबई अंधारात गेली की काळजी घेता, उर्वरीत महाराष्ट्राचे काय?

सध्या सर्वच कुस्तीगीरांचा वैयक्तीतक सराव सुरु आहे. डमी सोबत सराव करणे सुरु आहे. डमीला प्रतिस्पर्धा मानून डावपेच सध्या करत आहोत. पण हे कितपत उपयोगात येईल हा प्रश्‍न आहे. 
- महेश मोहळ, महाराष्ट्र उपकेसरी. 

रोप क्‍लायबिंग. डंबेल्स, फ्रीवेट, टायरचा उपयोग करुन ताकद वाढवणे, धावणे हे सर्व प्रत्येक कुस्ती केंद्रा मध्ये सुरु आहे. मी सध्या सराव करत आहे मात्र तो पाहिजे तसा करता येत नाही. 
- किरण भगत महाराष्ट्र उपकेसरी. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT