Maharashtra Police interesting tweet for Corona public awareness viral
Maharashtra Police interesting tweet for Corona public awareness viral 
पुणे

बबड्या सुधारलाय का? महाराष्ट्र पोलिसांच्या भन्नाट ट्विटने रंगली चर्चा

सकाळवृत्तसेवा

पुणे : तुम्हाला बबडया माहिती आहे, तोच हो बबडया "अग्गबाई सासुबाई"मधला. मिस्टर अभिजीत राजेना कायम करणाऱ्या चिडखोर बबडया एव्हाना प्रत्येक घरात पोचला, तसाच तो पोलिसातही पोचलाय. नाही, नाही तसा त्याने काही गुन्हा केला नाही, पण महाराष्ट्र पोलिसच त्याच्या प्रेमात पडले असून त्यांनी त्यांच्या ट्विटरवर "बबडया मास्क लावतो, कारण तो आता सुधारला आहे" असे ट्वीट केले आहे.

कोरोनामुळे गुरुजींना आले 'अच्छे दिन'; बाप्पाची ऑनलाइन प्राणप्रतिष्ठापना करण्यावर भर!​
 
टिव्हीवरील हिंदी किंवा मराठी मालिका म्हणजे गृहिणीच्या मनोरंजनाचे सर्वोत्तम साधन. त्यामुळे कुटुंबातील इतर सदस्य देखील त्या मालिका तितक्याच आवडीने बघतात. दररोज सायंकाळी सात वाजल्यानंतर प्रत्येकजण आपापल्या आवडीच्या मालिका बघण्यात व्यस्त असतात. सध्या टीव्हीवर सुरु असलेली "अग्गबाई सासुबाई" ही मालिका गृहिणीमध्ये चांगलीच प्रसिद्ध झाली आहे. त्यातील डॉ. गिरीष ओक, (अभिजीत राजे), निवेदिता सराफ (आसावरी), तेजश्री प्रधान (शुभ्रा) व आशुतोष पत्की (सोहम उर्फ बबडया) या कलाकारांनी साकारलेल्या भूमिका प्रेक्षकांच्या 
विशेष पसंतीस पडल्या आहेत. 

Ganeshotsav 2020 : श्रीमंत दगडूशेठ मंदिर ट्रस्टचा मोठा निर्णय; यंदा उत्सवकाळात मंदिरात एन्ट्री नाही!​

विशेषत: आईचा लाडका सोहम उर्फ बबडयायाच्या काहीशा हटके भूमिकेमुळे तो प्रेक्षकांच्या चांगला लक्षात राहिला आहे. त्याच्या भुमिकेचा आधार घेत महाराष्ट्र पोलिसांनी एक ट्विट केले आहे. त्यामध्ये "बबडया चांगला आहे की वाईट हे आम्हाला माहित नाही. पण बबडया एक जबाबदार नागरिक नक्कीच आहे." असे ट्विट केले आहे. ट्विटमध्ये मास्क घातलेल्या बबडयाच्या फोटोखाली "बबडया मास्क लावतो, कारण तो आता सुधारला आहे" असे वाक्य वापरत कोरोनाबाबत निष्काळजी असलेल्या नागरिकांना पोलिसांनी मास्कचा वापर करण्याचा सल्ला दिला आहे. 
 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

IPL 2024: RCB चा आनंद गगनात मावेना! प्लेऑफमध्ये पोहचताच केला जोरदार जल्लोष, पाहा Video

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

SCROLL FOR NEXT