maharashtra Politics shiv sena activist support cm uddhav thackeray aditya thackeray
maharashtra Politics shiv sena activist support cm uddhav thackeray aditya thackeray sakal
पुणे

बंडखोरांना सदबुद्धीसाठी बारामतीत शिवसेनेकडून गणरायाची आरती

सकाळ वृत्तसेवा

बारामती : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांना पाठिंबा देण्यासाठी शहरातील भिगवण चौकामध्ये आज (ता. 27) शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी ढोल वाजवत घोषणा दिल्या. सकाळी बारामती तालुका व शहर शिवसेनेच्या वतीने ढोल वाजवत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांना पाठिंबा दर्शविण्यात आला. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

शहराच्या मध्यवर्ती असलेल्या भिगवण चौकात शिवसेनेच्या वतीने बंडखोरी केलेल्या आमदारांना सदबुद्धी देवो व शिवसेनेवर आलेले संकट टळो अशी प्रार्थना गणरायाला करण्यात आली. बंडखोर स्वगृही परत यावेत यासाठी गणपती बाप्पाचीआरती करण्यात आली. यावेळी जिल्हा सहसंपर्कप्रमुख अॅड. राजेंद्र काळे, उपजिल्हाप्रमुख बाळासाहेब शिंदे, तालुकाध्यक्ष विश्वास मांढरे, भीमराव भोसले, शहर प्रमुख पप्पू माने, युवा सेना तालुकाध्यक्ष निखील देवकाते, युवा सेना शहराध्यक्ष गणेश करंजे, दिग्विजय जगताप, शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT