school reopen  sakal media
पुणे

Pune : सक्षमपणे शाळा सुरू करण्यासाठी शिक्षण विभागाची ‘एबीसी’

राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी नुकताच कोरोनाच्या काळात शाळा सुरू करताना काय काळजी घ्यावी, याबाबत मार्गदर्शन करणारी ‘एबीसीडी’ आहे

सकाळ वृत्तसेवा

पुणे : ए फॉर अटेंडन्स (हजेरी. परंतु आता अनिवार्य नाही), बी फॉर बॅक टू स्कूल (परत शाळेत या), सी फॉर कनसेंट (शाळेत येण्यासाठी पालकांची संमती आवश्यक) अशा स्वरूपात सध्या शाळा सुरू असताना कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी काय उपाययोजना करणे आवश्यक आहे. शाळा आणि शिक्षकांनी काय काळजी घ्यावी, विद्यार्थ्यांनी काय करावे, याबाबत जनजागृती करणारी ‘एबीसी’ शिक्षण विभागाने सादर केली आहे.

राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी नुकताच कोरोनाच्या काळात शाळा सुरू करताना काय काळजी घ्यावी, याबाबत मार्गदर्शन करणारी ‘एबीसीडी’ आहे. यात इंग्रजीतील प्रत्येक मुळाक्षरानुसार मार्गदर्शनपर सूचना देण्यात आल्या आहेत. या संदर्भातील व्हिडिओ गायकवाड यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकांउटद्वारे शेअर केला आहे. शहरी भागात इयत्ता आठवी ते बारावी आणि ग्रामीण भागात इयत्ता पाचवी ते बारावीचे वर्ग सुरू झाले आहेत. परंतु हे सुरू असताना विद्यार्थ्यांच्या हजेरीत सातत्य टिकवून राहण्यासाठी, तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्याच्या त्यासाठी शिक्षकांसह विद्यार्थी आणि पालकांना सतत काळजी घ्यावी, याबाबत माहिती देणारी ही ‘एबीसी’ आहे.

‘एबीसी’तून दिलेल्या मार्गदर्शक सूचना :

  • शाळा आणि परिसरात दररोज नियमितपणे निर्जंतुकीकरण करावे- मित्र-मैत्रिणींना काही अंतर राखून भेटावे.

  • शाळेच्या आवारात सॅनिटायझरची व्यवस्था करावी

  • ‘नमस्ते’ म्हणून आदरभाव व्यक्त करावा

  • सातत्याने हात धुवावेत

  • स्वत:चे शालेय साहित्य स्वत:च वापरावे

  • शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे लसीकरण होणे आवश्यक

  • शिकण्याची मजा अनुभवा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT