Scholarship exam 
पुणे

पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा ढकलली पुढे! अर्ज भरण्याची मुदतही वाढवली

सकाळवृत्तसेवा

पुणे : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात येणारी पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती (पाचवी) आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (आठवी) येत्या 25 एप्रिल रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी आयोजित करण्यात येणार होती. मात्र आता ही परीक्षा 23 मे 2021 रोजी घेण्यात येणार आहे. शिष्यवृत्ती परीक्षेसाठी शाळा माहिती प्रपत्र आणि विद्यार्थ्यांचे ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी शाळांना 30 मार्च पर्यंतची मुदत दिली होती. आता परीक्षा पुढे ढकलल्यात आल्याने ही मुदत देखील वाढविण्यात आली आहे. आता शाळांना माहिती आणि विद्यार्थ्यांचे अर्ज 10 एप्रिलपर्यंत मुदतवाढ दिली आहे, अशी माहिती परिषदेच्या उपायुक्त शैलजा दराडे यांनी दिली प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. दहावी-बारावीच्या बोर्डाची परीक्षा नियोजित वेळपत्रकानुसार झाल्यानंतर पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा होणार आहे.  

ही परीक्षा एक महिना लांबणीवर टाकण्यात आली आहे. आता नव्या बदलांनुसार ही परीक्षा 23 मे 2021 रोजी होणार आहे. राज्यात करोनाग्रस्तांची संख्या वाढत चालली आहे. या पार्श्वभूमीवर ही परीक्षा लांबणीवर टाकण्यात आल्याची शक्यता आहे. अर्थात यासंदर्भात जारी करण्यात आलेल्या परिपत्रकात परीक्षा लांबणीवर टाकण्यामागील कारणाचा उल्लेख करण्यात आलेला नाही. ही परीक्षा सर्वसामान्य परिस्थितीत जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात आयोजित करण्यात येते मात्र, आता पुढे ढकललेल्या परीक्षेमुळे विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी अधिक वेळ उपलब्ध झाला आहे. 

अर्जांना दिलीय मुदतवाढ
दरम्यान, शिष्यवृत्ती परीक्षेसाठी अर्ज करण्यासाठी शाळांना 10 एप्रिल 2021 पर्यंत मुदतवाढ देखील देण्यात आली आहे. ही मुदत याआधी 30 मार्च 2021 रोजी संपणार होती. ही अर्जप्रक्रिया यंदा कोरोनामुळे ऑनलाइन होत आहे. मात्र, अर्ज करण्यासाठी आता दुसऱ्यांदा मुदतवाढ देण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Kesari News : महाराष्ट्र केसरीत थरार शिगेला; जय, हर्षवर्धन, महेंद्र व सिकंदर अंतिम फेरीत

Power Supply Interrupted : सात हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित; महावितरणकडून वसुली करण्यावर जोर

Iran-America War: इराणमध्ये अडकून पडलेल्या कच्च्या तेलाच्या विक्रीचा मार्ग मोकळा; अमेरिकेकडून निर्बंध मागे

Electric Bus : इलेक्ट्रिक बस ठरताहेत ‘पांढरा हत्ती’; सुमारे तीन हजार कोटींच्या मदतीसाठी महामंडळाचे साकडे

Ashok Kharat Files : भोंदू खरातची दिवसभर कसून चौकशी; नीरजकडून महत्त्वाची माहिती; मोबाईल, सीडीआर मागवला

SCROLL FOR NEXT