Sharad Pawar
Sharad Pawar esakal
पुणे

लखीमपूर घटनेबाबत खंबीर भूमिका घेतल्यानं राज्यात छापासत्र

मिलिद संगई

बारामती : आयकर विभागाने आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लक्ष्य करत जे छापासत्र केले, त्या बाबत आपल्याला फारशी माहिती नाही. मात्र उत्तरप्रदेशातील घटनेवर आपण जी खंबीर भूमिका घेतली त्याची प्रतिक्रिया म्हणून हे छापासत्र झाल्याची शंका ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज बोलून दाखवली.

बारामतीत माध्यमांशी बोलताना त्यांनी ही शंका बोलून दाखवली. आमच्या विरोधात घेतलेल्या भूमिकेची केंद्राकडून आलेली ही प्रतिक्रिया असावी असे ते म्हणाले. मात्र, या बाबत जर अधिकारी अजूनही त्यांचे काम करत असतील तर त्या बाबत आताच बोलणे योग्य नाही. त्यांचे काम पूर्ण झाल्यावर त्या बाबत बोलायला हवे, अशी प्रतिक्रीया ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी व्यक्त केली.

पवार म्हणाले, उत्तरप्रदेशाबाबत माझ्यासह सर्वच विरोधकांनी खंबीर भूमिका घेतली, महाराष्ट्र सरकारने मंत्रीमंडळाच्या बैठकीत लखीमपूर घटनेचा निषेध केला. मी स्वताः शेतक-यांवरील या हल्ल्याची तुलना जालियनवाला बाग हत्याकांडासोबत केली, त्याचा संताप व राग सत्ताधारी पक्षातील लोकांना आला आहे, त्याची प्रतिक्रीया म्हणूनच महाराष्ट्रात प्राप्तिकर विभागाचे छापासत्र आहे अशी शक्यता नाकारता येत नाही. अजित पवार यांची प्रतिक्रीया मी ऐकली, मुलींवर छापे टाकणे ही बाब योग्य नाही. प्राप्तिकर विभागाला अधिकार असला तरी त्याचा वापर करताना काही तारतम्य बाळगण्याची गरज आहे.

कुटुंबातील ज्या व्यक्तींचा व्यवहारांशी संबंध नाही, मुलींवरही छापे टाकणे हा अधिकाराचा अतिरेक आहे, त्या मुळे हा अधिकाराचा गैरवापर किती दिवस मान्य करायचा याचा विचार आता लोकांनीच करायला हवा. किरीट सोमय्या यांचा नामोल्लेख टाळून पवार म्हणाले, काही लोक आरोप करतात आणि त्या नंतर केंद्रीय यंत्रणा कारवाई करायला पुढे येतात, ही बाब सर्वाधिक आक्षेपार्ह आहे.

आगामी काळात एकत्र निवडणूका लढविण्याबाबत स्थानिक पातळीवर निर्णय घेतला जाईल. या पोटनिवडणूका आहेत, त्या मुळे लगेच निष्कर्ष काढणे योग्य नाही, मात्र महाविकास आघाडी एकत्र येऊन निवडणूकीला सामोरी गेली तर निकाल हा त्यांच्या बाजूने लागेल असा ट्रेंड सध्या दिसतो आहे, एकदम निष्कर्ष काढणे योग्य नाही मात्र सकृतदर्शनी तरी तसे वाटते आहे. केंद्रात विकासाच्या कामात पक्षविरहीत काम करुन सहकार्य करतात त्यात नितिन गडकरी आहेत, याचा पुनरुच्चार त्यांनी केला. केंद्राच्या मदतीने रस्त्यांची कामे करुन घेणे महत्वाचे आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT Live Score: शुभमन गिलही स्वस्तात बाद! गुजरातच्या दोन्ही सलामीवीरांना सिराजने धाडले माघारी

Congress : ''चार जूननंतर काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! एक काँग्रेस राहुल गांधींची तर दुसरी...'' प्रमोद कृष्णम् यांचा दावा

MPSC : मुख्य परीक्षा होऊन चार महिने झाले तरी निकाल लागेना; गट क संवर्गातील ७ हजार ५१० उमेदवारांचे भवितव्य टांगणीला

Viral Video: 'माझ्या आयुष्यातून निघून जा'; मेट्रोमध्येच भिडलं जोडपं, एकमेकांना मारल्या चापटा

Akshaya Tritiya 2024 : कुंडलीतील पितृदोष दूर करण्यासाठी अक्षय्य तृतीयेला करा हे उपाय, घरात नांदेल सुख-शांती 

SCROLL FOR NEXT