Bhor
Bhor 
पुणे

भोर : थोपटेंच्या विजयात मुळशीकरांची मते ठरली निर्णायक | Election Results 2019

बंडू दातीर

पौड (पुणे) : भोर विधानसभेसाठी झालेल्या निवडणुकीत मुळशीतून महाआघाडीतील काॅंग्रेसचे उमेदवार संग्राम थोपटे यांना विजयासाठी मुळशीकरांनी दिलेली मते निर्णायक ठरली. तथापि तालुक्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या काही दिग्गजांनी पाळलेली आघाडी आणि शिवसेनेच्या काही दिग्गजांनी केलेली बंडाळी व भाजपची स्थिर भूमिका थोपटेे यांच्या पथ्यावर पडली. त्यामुळे बंडाळी केलेल्या राष्ट्रवादीच्या आणि दरवेळी निष्ठेच्या बाता करणाऱ्या शिवसैनिकांना आता आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे. 

मुळशी तालुक्यातून थोपटे यांना 34 हजार 981 मते मिळाली. कोंडेंना 36 हजार 572, अपक्ष उमेदवार आत्माराम कलाटे यांना 5 हजार 661, वंचित आघाडीचे भाऊ मरगळे यांना 3 हजार 456, मनसेचे अनिल मातेरे यांना 2283, संभाडी ब्रिगेडचे पंढरीनाथ सोंडकर यांना 562, तर अपक्ष मानसी शिंदे यांना 482 मते मिळाली. नोटाला 994 मते मिळाली. पाच वर्षापूर्वी कोंडेंना जवळपास पंधरा हजाराची आघाडी देणाऱ्या मुळशीकरांनी यावेळी फक्त 1591 जास्त मते दिली.


या वेळच्या भोर विधानसभा निवडणूकीत मुळशीच्या पदरी तिसऱ्यांदा निराशाच पडली होती. आघाडीची उमेदवारी ठरल्याप्रमाणे कॉंग्रेसचे संग्राम थोपटे यांना मिळाली. परंतु युतीची उमेदवारी मुळशीतून मिळेल, अशी सर्वसामान्यांना अपेक्षा होती. मात्र सेनेचा उमेदवारीचा बी फॉर्म देण्याबाबत थोपटेंनी लावलेली व्यूहरचना यशस्वी झाली. दुसऱ्यांदा भोरमधून कुलदिप कोंडे यांना उमेदवारी मिळाली. उमेदवारी मिळण्याची ठाम आशा असल्याने आत्माराम कलाटे यांनी राष्ट्रवादीला जय महाराष्ट्र करीत हाती शिवबंधन बांधले आणि प्रचारालाही सुरूवात केली होती. परंतु, ऐनवेळी मातोश्रीतून फासे पलटले. उमेदवारीची माळ कोंडेच्या गळ्यात पडली. त्यामुळे निराश झालेले कलाटे यांनी बंडाचे निशान फुंकले होते.

भोरच्या रणांगणात संग्राम थोपटे, कुलदिप कोंडे, आत्माराम कलाटे असा तिरंगी सामना सुरू झाला. मात्र प्रचाराच्या काळात आघाडी आणि युतीच्या उमेदवाराची एकही जाहीर सभा तालुक्यात झाली नाही. अधिकृत पक्षाचा उमेदवार नसल्याने कार्यकर्ते, मतदारातही नाराजी पसरली. अनेकांनी पक्षनिष्ठा खुंटीवर टांगून मिळेल तिथून खिसा गरम करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे तालुक्यात निवडणूकीच्या वातावरणाचा रंग चढलाच नाही. 

मुळशी तालुक्यात शिवसेनेचा मतदार ठाम असतो, हे आतापर्यंतच्या निवडणुकीने दाखवून दिले होते. मात्र, या वेळी इच्छुकांच्या आशेवर पाणी पडल्याने शिवसेनेतील काही दिग्गज प्रचारापासून दूर राहीले. युती असतानाही पूर्वीच्या रागाचा बदला म्हणून की काय भाजपही शांत होती. पराभूत झाल्यानंतर गेल्या पाच वर्षात तसेच प्रचाराच्या काळातही कोंडे यांना मुळशीसाठी अपेक्षित वेळ देता आली नाही. नाराजांची त्यांना मनधरणी करता आली नाही. युतीचा सर्वाधिक मतदार असलेल्या पूर्वपट्टयातही कमी मतदान झाले. त्याची मोठी किमंत कोंडे यांना मोजावी लागली.

मुळशी तालुक्यात कॉंग्रेसपेक्षा राष्ट्रवादीची ताकद मोठी होती. परंतु, राष्ट्रवादीच्या काही पदाधिकाऱ्यांनी आघाडी धर्म प्रामाणिकपणे पाळला. काहींनी मात्र मुंह में राम बगल मे छुरी याप्रमाणे आघाडीत छुपी बंडाळी केली. तर काहींनी कलाटेंचा उघडउघड प्रचार केला. परंतु त्याचा थोपटे यांच्या मतावर काहीही परिणाम झाला नाही. दहा वर्षापूर्वी आठ हजार त्यानंतर 2014 ला चौदा हजार मते घेतलेल्या थोपटेंनी यावेळी आघाडीतून चौतीस हजार मते घेतली.यामध्ये गेल्या दहा वर्षात केलेल्या विकास कामांचाही थोपटे यांना फायदा झाला.

बंडाचे निशान फुंकलेले आत्माराम कलाटे यांना तालुक्याची अस्मिता म्हणून राष्ट्रवादी, शिवसेनेतील काही पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी छुपा तसेच उघडपणे पाठींबा दिला. मात्र प्रचारात विस्कळीतपणा बराचसा जाणवत होता. कलाटेंसाठी सुरूवातीला उत्साहाचे वाटणारे वातावरण मतदानाच्या दोन दिवस आगोदर बऱ्यापैकी शांत झाले होते. त्यामुळे कलाटे यांनी अपेक्षेपेक्षाही खूप कमी मतदान झाले.

मतदानाच्या दिवशी मतदारांना केंद्रापर्यंत आणण्यामध्ये पदाधिकाऱ्यांमध्ये कमालीची मरगळ दिसून आली. पुणेकर मतदारांनीही मुळशीकडे पाठ फिरवली. पूर्वभागातील सोसायटीमध्ये राहणाऱ्या उच्चशिक्षित मतदारही घरीच बसले. पावसाने विश्रांती घेतलेली असतानाही मताचा टक्का वाढला नाही.लोकसभेपेक्षाही विधानसभेला कमी मतदान झाले. सेनेतील अनेक पदाधिकारी स्वतःचे मत दिल्यानंतर गायब झाले. त्यामुळे मतदानाच्यादिवशीही शिवसैनिक सैरबैर झाला होता. त्याचाही फायदा थोपटे यांना झाला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naseem Khan: नसीम खान यांची नाराजी दूर करण्यात काँग्रेसला यश? पुण्यात धंगेकरांच्या प्रचारासाठी लावली हजेरी

MI vs KKR Live IPL 2024 : मुंबईच्या गोलंदाजांची कमाल, केकेआरला पॉवर प्लेमध्येच दिले चार धक्के

Rohit Sharma MI vs KKR : टी 20 वर्ल्डकपचा संघ जाहीर होताच मुंबईच्या प्लेईंग 11 मधून रोहितचं नाव गायब, काय आहे कारण?

Pune Loksabha election 2024 : ''आरक्षणाच्या पन्नास टक्क्यांच्या मर्यादेबद्दल मोदींनी भूमिका जाहीर करावी, आमचं ठरलंय...'' राहुल गांधी स्पष्टच बोलले

Latest Marathi News Live Update : जीएसटी फक्त अदानींच्या फायद्याचा- राहुल गांधी

SCROLL FOR NEXT