भोसरी - शहरातील ज्येष्ठ नेते आझम पानसरे यांच्या निवासस्थानी भोसरी मतदारसंघातील अपक्ष उमेदवार विलास लांडे यांच्या पाठिंब्यासाठी झालेली बैठक.
भोसरी - शहरातील ज्येष्ठ नेते आझम पानसरे यांच्या निवासस्थानी भोसरी मतदारसंघातील अपक्ष उमेदवार विलास लांडे यांच्या पाठिंब्यासाठी झालेली बैठक. 
पुणे

Vidhan Sabha 2019 : भोसरी : आझम पानसरे यांचा विलास लांडेंना पाठिंबा

सकाळ वृत्तसेवा

विधानसभा  2019 : पिंपरी - ‘विलास लांडे हे भोसरी मतदारसंघाचे दहा वर्षे आमदार होते. त्यांनीच या मतदारसंघाचा विकास केला आहे. ते कोणीही नाकारू शकणार नाही,’’ असे गौरवोद्‌गार काढले. 

माजी महापौर आझम पानसरे यांनी भोसरी मतदारसंघातील अपक्ष उमेदवार विलास लांडे यांना पाठिंबा जाहीर केला. गेल्या निवडणुकीत पानसरे यांनी ताकद महेश लांडगे यांच्या मागे लावली होती. पानसरे हे पिंपरी-चिंचवडच्या राजकारणातील ज्येष्ठ नेते आहेत. ते राष्ट्रवादी काँग्रेसचे सलग दोनवेळा शहराध्यक्ष राहिले आहेत. तसेच माजी महापौर, राज्य ग्राहक समिती अध्यक्षपदही त्यांनी भूषविले आहे. त्यांना शहरातील मुस्लिम आणि मागास समाजात मोठा मान आहे. त्यामुळे हा मतदार कायम त्यांच्या पाठीशी आहे. पानसरे यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत त्यांनी लांडे यांना पाठिंबा जाहीर केला. तसेच लांडे यांनी पुन्हा आमदार होऊन या मतदारसंघाचा विकास करावा, अशा शुभेच्छाही दिल्या. या वेळी लांडे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष संजोग वाघेरे व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT