Rally
Rally 
पुणे

Vidhan Sabha 2019 : रोजंदारीवरील कार्यकर्त्यांची वर्दळ

सकाळ वृत्तसेवा

विधानसभा 2019 : पिंपरी - निवडणुका म्हटल्या, की उमेदवारांच्या सभोवताली कार्यकर्त्यांची गर्दी ही आलीच. यासाठी सर्वच राजकीय पक्षांकडून रोजंदारीवर कार्यकर्ते उपलब्ध करून घेण्याचा ‘ट्रेंड’ रुजला आहे. आता निवडणुकीच्या माध्यमातून चांगला रोजगार उपलब्ध होत असल्याने दादा, भाऊंप्रमाणे ताईंनासुद्धा महत्त्व प्राप्त झाले आहे. परिणामी यंदाच्या प्रचारात रोजंदारीवरील महिला ‘कार्यकर्त्यां’ची सगळीकडे वर्दळ दिसून येत आहे.

आजकाल पक्षासाठी एकनिष्ठपणे कार्य करणारे कार्यकर्ते बोटावर मोजण्याइतकेच उरले आहेत. त्यामुळे प्रचारासाठी कार्यकर्ते रोजंदारीवर आणण्याचा एक नवा ट्रेंड आला आहे. यामुळे शहरातील बहुतेक झोपडपट्ट्यांमधील महिलांना रोजगार उपलब्ध झाला आहे. मतदानात महिला मतदारांची महत्त्वाची भूमिका बजावतात. या अनुषंगाने महिला मतदारांपर्यंत पोचता यावे, याकरिता सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी जास्तीत जास्त महिलांची ‘कार्यकर्त्या’ म्हणून जमवाजमव केली आहे. त्यामुळे सध्या सगळ्यांच्या प्रचारात महिलांची गर्दी दिसून येत आहे. 

गळ्यात पक्षाची मफलर, फेटा, हातात जाहीरनामा, झेंडा घेऊन रॅली, चौक, कोपरा सभांच्या ठिकाणी प्रचारासाठी महिला गर्दी करताना दिसतात. हे कार्यकर्ते जमवण्यासाठी महिला बचतगटांची मोठ्या प्रमाणावर मदत घेतली जाते. 

राजकीय पक्षाच्या महिला उमेदवार या बचतगटांशी संलग्न असतात. यातील बहुतांश महिला या गरीब कुटुंबातील असल्यामुळे उमेदवारांना सहज कार्यकर्ते मिळतात. या महिलांना दररोज प्रचारासाठी साधारण ५०० ते ७०० तर काहींना अर्ध्या दिवसासाठी ३०० रुपये मोबदला, दोन वेळचे जेवण, चहा- नाश्‍ता दिला जात आहे. त्यामुळे निवडणुकांच्या काळात महिलांना ‘अच्छे दिन’ आले आहेत, एवढे नक्की.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Sharma Rinku Singh : पत्रकार परिषदेनंतर रोहित रिंकूला भेटला; केकेआरनं केलं ट्विट

SRH vs RR Live IPL 2024 : हैदराबाद पुन्हा 200 पार! रेड्डी अन् क्लासेननं स्लॉग ओव्हरमध्ये राजस्थानला धुतलं

Akola News : अनुपजी..भाजपचे पैसे पोहचले नाही; व्हीडिओ व्हायरल, बार्शिटाकळीत गुन्हा दाखल

Latest Marathi News Live Update: अमेठीत राहुल गांधींच्या उमेदवारीची चर्चा; कार्यकर्त्यांनी पोस्टर्सही छापले

Commuter Murder Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये प्रवाशाची हत्या! गर्दुल्यांकडून ट्रेनमध्ये हैदोस

SCROLL FOR NEXT